Amarnath Yatra 2020 : 21 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान होणार अमरनाथ यात्रा, भाविकांसाठी COVID-19 टेस्ट गरजेची, ‘या’ 7 गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमरनाथ यात्रा २०२० बद्दल मोठी माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या २१ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान अमरनाथ यात्रा २०२० सुरू होईल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या वेळी केवळ कोरोना चाचणी केलेल्या भाविकांनाच अमरनाथ यात्रा २०२० साठी परवानगी दिली जाईल. यावेळी अमरनाथ यात्रा केवळ दोन आठवडेच चालणार आहे. या यात्रेसाठी फक्त एकच मार्ग निश्चित करण्यात आला आहे. तसेच यात्रा फक्त उत्तर काश्मीर बालताल मार्गावरुन जाईल. तर जे भाविक प्रवास करू शकणार नाहीत, त्यांच्यासाठी बाबा बर्फानी यांचे लाईव्ह कव्हरेज दिले जाईल. अधिकाऱ्यांनी सांगितले, ‘यंदा कोणत्याही यात्रेकरूला पहलगाम मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही.’

यावेळी अमरनाथ यात्रा २०२० केवळ १५ दिवसांच्या कालावधीची असेल. असे श्री अमरनाथजी श्राईन बोर्डाच्या (एसएएसबी) अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. एसएएसबी जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात समुद्रसपाटीपासून ३,८८० मीटर उंच असलेल्या गुहा मंदिरात प्रवासाचे व्यवस्थापन करते. यात्रेसाठी ‘प्रथमपूजा’ शुक्रवारी (५ जून) आयोजित केली होती. पण यावेळी जागतिक कोरोना महामारीमुळे अमरनाथ यात्रा २०२० मध्ये कपात गेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बालताल ते पवित्र गुहेकडे जाणाऱ्या मार्गावरील बर्फ काढण्याचे काम सुरू केले आहे.

अधिकाऱ्यांनी हेही ठरवले आहे की, १५ दिवसांत सकाळी आणि संध्याकाळी गुहेच्या मंदिरात होणारी आरती देशभरातील भाविकांसाठी थेट प्रसारित केली जाईल. अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्थानिक मजुरांची अनुपलब्धता आणि बेस कॅम्प ते गुहेच्या मंदिरापर्यंत ट्रॅक राखण्यात अडचणी आल्यामुळे यात्रा २०२० साठी गांदरबल जिल्ह्यातील बालताल बेस कॅम्प ते गुहेपर्यंत पोचण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जाईल. यात्रा २०२० ची सांगता ३ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी श्रावण पौर्णिमेला होईल.

या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल
प्रवास करणाऱ्या सर्व लोकांकडे कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
साधूंना वगळता इतर यात्रेकरूंमध्ये ५५ वर्षापेक्षा कमी वयाच्या लोकांना परवानगी दिली जाईल.
एसएएसबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “यात्रेकरूंना जम्मू-काश्मीरमध्ये यात्रा सुरू करण्याची परवानगी देण्यापूर्वी त्यांना विषाणूसाठी क्रॉस-चेक केले जाईल.”
साधू वगळता सर्व यात्रेकरूंनी प्रवासासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागेल.
यात्रेत गांदरबल जिल्ह्यातील बालताल बेस कॅम्प ते गुहेपर्यंत पोहोचण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जाईल.
अमरनाथ यात्रा २०२० केवळ उत्तर काश्मीर बालताल मार्गावरुन जाईल.
यावर्षी कोणत्याही यात्रेकरूला पहलगाम मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like