‘पुण्यतिथी’ला बनवला ‘डेड बॉडी’ केक, कापून खाऊ म्हणून खाल्लं लोकांनी अन् व्हिडीओ झाला ‘व्हायरल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील अनेक देशांच्या लोकांचे राहणीमान वेगवेगळ्या पद्धतीचे असते. एवढेच नाही तर लोकांच्या जगण्यापासून ते मरण्यापर्यंत विविध धर्मांनुसार वेगवेगळे रितीरिवाज असतात. बदलत्या युगानुसार लोकांच्या जीवनशैलीत देखील बदल होत आहेत. तसेच लोकांचा आता आपल्या जवळच्या लोकांप्रती प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती देखील बदलत आहेत.

असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. डेथ अ‍ॅनिव्हर्सरीच्या प्रसंगी एका व्यक्ती सारख्या दिसणाऱ्या केकला लोक कापून खात होते.

डेथ एनिवर्सरी पर बनाया 'डेड बॉडी' केक, काटकर खा गए लोग, VIDEO वायरल

व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की काही मुले हातात प्लेट घेऊन चमच्याने केकचे तुकडे खात आहेत. इतकेच नाही तर तेथे सेवा देण्यासाठी वेटरसुद्धा उपलब्ध आहेत. तसेच व्हिडिओमध्ये बरेच फोटोग्राफर याचे फोटो काढताना दिसत आहेत.

डेथ एनिवर्सरी पर बनाया 'डेड बॉडी' केक, काटकर खा गए लोग, VIDEO वायरल

हा व्हिडीओ स्पेनचा असल्याचे सांगितले जात आहे. तथापि याबद्दल अजून पुष्टी करण्यात आलेली नाही. या व्हिडीओला लोक मोठ्या मजेने सोशल मीडियावर शेअर करत आहेत. एक युजरने लिहिले की, डेथ अ‍ॅनिव्हर्सरीला हेच पाहायचं बाकी होतं.’

डेथ एनिवर्सरी पर बनाया 'डेड बॉडी' केक, काटकर खा गए लोग, VIDEO वायरल

सुरुवातीला हा व्हिडिओ पाहताना पाहणाऱ्याला धक्का बसू शकतो. परंतु हा व्हिडीओ जेव्हा आपण मन लावून पाहाल तर समजेल की तो एक मृतदेह नसून ‘केक’ आहे. ज्याला खूप कौशल्य पणाला लावून बनवण्यात आले आहे. त्या केकला अशा पद्धतीनं सजवण्यात आले आहे की तो एक मृतदेहासारखाच दिसतो.

डेथ एनिवर्सरी पर बनाया 'डेड बॉडी' केक, काटकर खा गए लोग, VIDEO वायरल

या व्हिडिओची छायाचित्र कोणत्याही माणसाची डोकेदुखी निर्माण करण्यासाठी पुरेसे आहेत. लोकांनी हा व्हिडिओही खूप शेअर केला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत १ मिलियन पेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे.

You might also like