आश्चर्यजनक… ४ पाय, २ लिंग असलेल्या बाळाने घेतला जन्म….

गोरखपूर (उत्तर प्रदेश) : वृत्तसंस्था

उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यात चार पाय आणि दोन लिंग असलेल्या बाळाने जन्म घेतला आहे. या घटनेनंतर स्थानिक लोकांनी निसर्गाचा चमत्कार मानून या बाळाला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. या बाळाला पाहताच त्याच्या आईवडिलांसह डॉक्टरांनाही धक्काच बसला.

[amazon_link asins=’B07G26PLDJ,B075F4QR9J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ccbf6e53-b9a5-11e8-b0c5-43881d4d0b4f’]

मिळालेल्या माहितीनुसार, गोरखपूर येथील जिगिना गावातील जोडप्याला चार पाय आणि दोन लिंग असलेलं बाळ झालं आहे. भूलन निषाद आणि रंभा असं या जोडप्याचं नाव आहे. रंभाला शनिवारी (15 सप्टेंबर) प्रसूतीकळा सुरू झाल्याने स्थानिक सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे तिने या बाळाला जन्म दिला.

चार पाय आणि दोन लिंग असलेलं बाळ पाहून डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला. गावकऱ्यांना याची माहिती मिळताच बाळाला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली. मात्र बाळाला आता जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.