कोरोनाच्या महामारीमध्ये Mask किती गरजेचा, ‘या’ फोटोपेक्षा अधिक कोण चांगलं सांगणार

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जगभरातील बातम्यांचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफर्सना वर्षातून एकदा पुरस्कार जिंकण्याची संधी मिळते. वर्ल्ड प्रेस फोटो कॉन्टेस्टमध्ये यावर्षी पाच नॉमिनेटेड फोटो जगातील प्रत्येक परिस्थितीचे वर्णन करत आहेत. मागील वर्षी कोरोना व्हायरसने सर्वाधिक थैमान घातले होते, परंतु कोरोना व्हायरसमध्ये मास्क किती महत्वाचा आहे हे दाखविण्यासाठी यापेक्षा चांगला फोटो असूच शकत नाही. या फोटोत कॅलिफोर्निया सी लायन समुद्राच्या आत मास्कसोबत खेळत आहे. हा फोटो अमेरिकेचा फोटोग्राफर राल्फ पेसने घेतला आहे. या फोटोत दाखविले गेले कि, कोरोना व्हायरस साथीच्या दरम्यान जीवनाचे महत्त्व काय आहे.

डॅनिश वृत्तपत्र पॉलिटिकेनमध्ये प्रकाशित झालेला हा फोटो ब्राझिलच्या साओ पाउलो येथे घेण्यात आला आहे. याला ‘द फर्स्ट अँब्रेस’ असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये केअर होममध्ये राहणारी वृद्ध महिला रोजा लूजिया लूनार्डीला एड्रियाना सिल्वा डे कोस्टा सुजाने कित्येक महिने आयसोलेशनमध्ये राहिल्यानंतर मिठी मारली. कोरोनामुळे, लाखो ब्राझिलियन त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यास असमर्थ आहेत. अशा परिस्थितीत प्रेमाच्या या मिठीने माहित नाही किती दिलासा मिळाला असेल. फोटोग्राफर मॅड्स निसेन यांनी हा फोटो घेतला आहे.

टोळांच्या हल्ल्याचा हा फोटो फोटोग्राफी अवॉर्डमध्ये फोटो ऑफ द इयरसाठी नामांकित झाला आहे. हा फोटो फोटोग्राफर लुईस टाटो यांनी वॉशिंग्टन पोस्टसाठी घेतला होता. हा फोटो दाखवितो कि, केनियाचा एक शेतकरी पूर्व आफ्रिकेतील टोळांच्या हल्ल्याशी कसा झगडत आहे. टोळ हल्लाने गेल्या वर्षी बर्‍याच देशांमध्ये विनाश केला होता.

हा फोटो नेचर सिंगल कॅटॅगरीमध्ये समाविष्ट केला आहे. जो न्यू लाइफ मासिकासाठी फोटोग्राफर जैमी कुलेब्रस यांनी घेतला आहे. जैमीने हा फोटो इक्वेडोरच्या ट्रॉपीयल अँड्रिएल क्लाऊड फॉरेस्टमध्ये घेतला आहे. पानाच्या टोकाशी लटकलेले हे छोटे प्राणी म्हणजे विलिस ग्लास फ्रॉगची अंडी आहेत. हा बेडकाच्या अत्यंत दुर्मिळ प्रजातीचा फोटो आहे.

हवामान बदलाशी लढा देण्याचा एक मार्ग म्हणजे स्वत: चा ग्लेशियर तयार करणे. हा फोटो नॅशनल जिओग्राफिकसाठी फोटोग्राफर सिरिल जाजबेक यांनी घेतला होता. हे पर्यावरणविषयक स्टोरी कॅटेगरीत नॉमिनेटेड झाले आहे. हा आईस कोन भारताच्या लडाखमध्ये बनविला गेला आहे. शेतीसाठी पाण्याची बचत करण्याचा हा एक मार्ग आहे. कारण लडाखमध्ये ग्लेशियर हा एकमेव पाण्याचा स्त्रोत आहेत, जो वेगाने वितळत आहेत. 15 एप्रिल रोजी या फोटोंमधील एका फोटोची निवड करून हा पुरस्कार देण्यात येणार आहे.