Amazon ने लाँच केला नवीन प्रोग्राम, ‘या’ मेंबर्सकडे असेल स्मार्टफोन ’सहज’ खरेदीचे ऑपशन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेझॉनने मंगळवारी प्राइम मेंबर्ससाठी एक नवीन प्रोग्राम लाँच केला आहे. या प्रोग्रामद्वारे मेंबर्स लोअर मंथली इन्स्टॉलमेंट्समध्ये एक नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकतात. यास ‘Advantage No Cost EMI’ नाव देण्यात आले आहे. सध्या या प्रोग्रामचा लाभ HDFC बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे ईएमआय ट्रांजक्शन्स करणार्‍या प्राइम मेंबर्सला मिळेल.

ई-कॉमर्स कंपनीचा दावा आहे की, या नव्या प्रोग्रामद्वारे मेंबर्स स्मार्टफोन्स खरेदीवर मंथली ईएमआय 50 टक्केपर्यंत कमी करू शकतात. यास फ्लिपकार्टविरूद्ध कॉम्पिटिटिव्ह पाऊल सुद्धा मानले जाऊ शकते. कारण फ्लिपकार्टकडे निवडक सॅमसंग फोन्ससाठी एक्सक्ल्यूझिव्ह फ्लिपकार्ट स्मार्ट अपग्रेड प्लॅन आहे.

या प्रोग्रामद्वारे कोणत्याही प्राइम मेंबरला कोणतेही डिस्काऊंट मिळणार नाही. मेंबर्स केवळ आपल्या इन्स्टॉलमेंटचा कालावधी वाढवू शकतील आणि मंथली पेमेंट्स 50 टक्के कमी करू शकतील.

प्रेस रिलीजद्वारे जी ऑफिशियल डिटेल देण्यात आली आहे, त्यानुसार, हा नवीन प्रोग्राम निवडक स्मार्टफोन्सच्या खरेदीसाठी सध्याच्या नो-कॉस्ट ईएमआय बेनिफिटसह उपलब्ध राहील. हा प्लॅन नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर ग्राहकांवर पडणारा मंथली इन्स्टॉलमेंटचा भार कमी करण्याच्या उद्देशाने आणला आहे.

उदाहरणार्थ, एखाद्या स्मार्टफोनसाठी तुम्हाला 6 महिन्यापर्यंत प्रत्येक महिन्याला 5,000 रुपयांचा ईएमआय भरावा लागत असेल तर अ‍ॅडव्हान्टेज नो कॉस्ट ईएमआय प्रोग्रामद्वारे तुम्ही यास बदलून 12 महिन्यांपर्यंत दरमहिना 2,500 रुपयांच्या पेमेंटमध्ये बदलू शकता.

कालावधी वाढवण्याचा ऑपशन मिळवण्यासाठी तुम्हाला अमेझॉनवर लिस्टेड कोणत्याही एलिजिबल स्मार्टफोनच्या प्रॉडक्ट पेजवरील ईएमआय ऑपशनवर क्लिक करावे लागेल. येथे तुम्हाला तुमच्या नो-कॉस्ट ईएमआय खरेदीचा कालावधी 12 महिन्यापर्यंत वाढवण्याचा ऑपशन आहे.

अमेझॉनने अडव्हान्टेज नो-कॉस्ट ईएमआय प्रोग्रामला विशेषकरून निवडक स्मार्टफोन्स साठी सादर केले आहे. यामध्ये iPhone 12 mini, Samsung Galaxy M21, Samsung Galaxy M31s, Oppo A15, Oppo Find X2 Pro ही नावे आहेत. अमेझॉनच्या या नवीन पावलाने भारतीय ग्राहक आपल्या पसंतीच्या स्मार्टफोनसाठी आपले बजेट थोडे वाढवण्यासाठी तयार होऊ शकतात.