अमेझॉन ‘Alexa’ चे आले नवे ‘अपडेट’, आता Alexa ‘हिंदी’, ‘हिंग्लिश’ मध्ये ऐकणार तुमची ‘कमांड’

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – अमेझॉन अलेक्सा (amazon alexa) यूजर्ससाठी एक खूशखबर आहे. हिंदी आणि इतर भारतीय भाषेत बोलणाऱ्या यूजर्स आता आपल्या आवडीच्या भाषेत वॉइस कमांड देऊ शकतील. अलेक्सा, अमेझॉनचे एक असिस्टंट सॉफ्टवेअर आहे. याला कमांड देऊन तुम्ही क्रिकेटचा स्कोर पासून बातम्या, गाणी सर्व काही ऐकू शकतात.  
 
आता हिंदी सह हिंग्लिश देखील समजण्यास सक्षम अलेक्सा –
अमेझॉनने अलेक्साला 2017 साली भारतीय बाजारपेठेत आणले होते. त्यावेळी हिंदी, तमिळ, तेलगू, मराठी आणि पंजाबी अशा स्थानिक भाषेत गाणे,स्थळ आणि नाव ओळखण्यास अलेक्सा सॉफ्टवेअर सक्षम होते परंतू आता कंपनीच्या उपाध्यक्ष आणि शोध प्रमुख रोहित प्रसाद यांनी सांगिले की नव्या अपडेट नंतर अलेक्सा ग्राहकांचे पूर्ण हिंदी आणि हिंग्लिश समजण्यास सक्षम असेल.  
 
अलेक्साची स्पर्धा अ‍ॅपलच्या सीरी आणि गुगलच्या असिस्टंट बरोबर आहे. हे अमेझॉनच्या इको ब्ल्यूटूथ स्पीकरसह बोस, मायबॉक्स, आयबॉल आणि सिस्का सारख्या ब्राँड प्रोडक्टमध्ये उपलब्ध आहेत. 
प्रसाद यांनी सांगितले की भारताने आमच्या एआय (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) टीमसमोर मोठे आव्हान उभे केले, ज्यावर आम्ही काम केले आणि निश्चित केले की देशातील ग्राहक अलेक्सा बरोबर त्यांच्या स्थानिक भाषेत संवाद साधू शकतील. 
 

visit: Policenama.com