सर्वात ‘कमी’ किंमतीत मिळतोय लेटेस्ट iPhone 11 Pro-Max, ‘असा’ घ्या फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अ‍ॅमेझॉनवर अ‍ॅपल डे सेलचे आयोजन करण्यात आले आहे. हा सेल 17 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहिलं. अ‍ॅमेझॉनवर अ‍ॅपल डे सेलमध्ये ग्राहक लेटेस्ट iPhone 11 सीरीजवर ऑफर्सचा लाभ मिळवू शकतात. याशिवाय iPhone XR, अ‍ॅपल वॉच सीरिज आणि MacBook वर देखील ऑफर्स देण्यात येत आहेत. तसेच कॅशबॅक आणि फायनेंस ऑप्शन्स देखील ग्राहकांना देण्यात आले आहेत. HDFC च्या बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डवर डिस्काउंट्स देखील मिळत आहे.

कंपनीच्या मते ग्राहक या सेलमध्ये iPhone 11 सीरीज सर्वात कमी किंमतीला खरेदी करु शकतात. या सेलमध्ये iPhone 11 Pro 93,900 रुपयांना मिळेल तर iPhone 11 Pro Max 1,03,900 रुपयांना मिळेल. तसेच HDFC बँकेच्या डेबिट, क्रेडिट कार्डवर iPhone 11 Pro वर 600 रुपयांची अतिरिक्त सूट आणि iPhone 11 Pro Max वर 7,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल.

यासह या सेलमध्ये iPhone XR 47,900 रुपये किंमतीला खरेदी करता येईल. ही किंमत 128 जीबी वेरिएंटची आहे. 64 GB वेरिएंट 44,900 रुपयांना आहे. तसेच एक्सचेंजअंतर्गत 10,550 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. Amazon द्वारा ICICI बॅंक क्रेडिट EMI ट्रांजेक्शनवर 5 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल तसेच ICICI डेबिट EMI ट्रांजेक्शनवर 10 टक्क्यांपर्यंत इंस्टंट डिस्काउंट मिळेल.

iPhone 11 कोणतीही सूट तर देण्यात आलेली नाही परंतु ग्राहकांना HDFC बँकेच्या ऑफरअंतर्गत 6,000 रुपयांचे इंस्टंट डिस्काउंट मिळेल. iPhone 11 च्या 64GB वेरिएंटची किंमत 58,900 रुपये आहे.
Apple वॉच सीरीज वर 30 टक्के सूट आहे. तर HDFC बॅंक कार्ड्स आणि EMI ट्रांजेक्शनवर 4,000 रुपयांची सूट मिळेल. Watch Series 4 कंपनीने अधिकृतपणे बंद केले आहे आणि त्याजागी Watch Series 5 उपलब्ध करुन दिले आहे. हे अ‍ॅमेझॉनवरुन खरेदी करता येईल.
या सेल दरम्यान MacBook Air वर 6,000 रुपयांचे इस्टेंट डिस्काउंट आहे. याच प्रकारे नव्या आणि जुन्या प्रोडक्ट्सवर ऑफर्स दिल्या जात आहेत.

You might also like