धक्कादायक ! हिप्नोटाईज करून डिलिव्हरी बॉयकडून बलात्काराचा प्रयत्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अ‍ॅमेझॉनवरून खरेदी केलेल्या वस्तु पोहचवण्यासाठी घरी आलेल्या डिलिव्हरी बॉयनं महिलेला सम्मोहित करून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना नवी दिल्लीत घडली असून यासंदर्भात महिलेने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. भुपेंद्र पाल असे त्या डिलिव्हरी बॉयच नाव असून तो अ‍ॅमेझॉनवरून खरेदी केलेले काही सामान रिटर्न घेण्यासाठी आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार , सदर महिलेला अ‍ॅमेझॉनवरून काही दिवसांपूर्वी सामनाची खरेदी केली होती. मात्र त्यातील काही सामान तिला रिटर्न पाठवायचे होते. डिलिव्हरी बॉय आणि त्या महिलेत सामनावरून वाद झाला. त्यानंतर पिडित महिलेनं कस्टमर केअरला फोन लगावत याबाबत माहिती दिली. त्या डिलिव्हरी बॉयने महिलेला सम्मोहित करून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान महिला शुद्धीवर आली आणि तिने डिलिव्हरी बॉयची धुलाई केली. या घटनेविषयी तिने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.

 

visit : policenama.com