तलाकसाठी ‘या’ कंपनीच्या मालकानं पत्नीला दिले ३८ अरब डॉलर, पत्नी बनली जगातील ४ थ्या क्रमांकाची ‘श्रीमंत’ महिला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात मोठा श्रीमंत व्यक्ती अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांनी पत्नी मॅकेजी बेजोस हिला घटस्फोट दिल्यानंतर पत्नीला ३८ अरब डॉलर मिळणार आहे. हा जगातील सर्वात मोठा आणि महागडा घटस्फोट आहे. बेजोस अ‍ॅमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. मॅकेंजी आणि जेफ यांचा विवाहाला तब्बल २६ वर्षा आधी झाला होता.

मॅकेजी ४९ वर्षीय असून लेखिका आहेत. घटस्फोट मिळाल्यानंतर त्या जगातील ४ थ्या सर्वात श्रीमंत महिला असेल. मॅकेंजी बेजोस यांनी आधीच सांगितले आहे की त्या त्यांच्या संपत्तीतून अर्धा वाटा सामाजिक दायित्व म्हणून दान करतील.

मॅकेंजी यांच्या जेफ यांच्याबरोबर १९९३ साली विवाह झाला होता. याच्या एका वर्षानंतर जेफ यांनी सिअ‍ॅटल मधूल अ‍ॅमेझानला सुरुवात केली होती. मॅकेंजी यांनी सांगितले की त्यांच्याकडे देण्यासाठी भरपूर पैसा आहे. जोपर्यंत यांच्याकडील संपत्ती संपणार नाही तोपर्यंत त्या पैसे दान करत राहतील.

घटस्फोटानंतर पत्नीला ३८ अरब डॉलर दिल्यानंतर देखील Amazon चे मालक असलेले जेफ बेजोफ १८८ अरब डॉलरच्या संपत्ती सह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

सुंदर दिसायचय ? ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा

‘झटपट मेकअप’ करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स

विना परवाना शेकडो खड्डे खोदल्याने नगर परिषदेचा समोर आला गलथान कारभार

पोट आणि कंबर अधिक आकर्षक करण्यासाठी करा’स्ट्रेचिंग’

किडनी आणि ह्रदय विकारावर द्राक्ष आहेत गुणकारी