3,232 रुपयांमध्ये 32 इंची Smart TV आज खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या सेलची वेळ

पोलिसनामा ऑनलाईन : आपण स्पीकरच्या किंमतीत स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर आपले हे स्वप्न पूर्ण होणार आहे. आपल्याला आज म्हणजेच 18 ऑक्टोबरपासून Amazon च्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याची संधी मिळेल. चला या ऑफरबद्दल तपशीलवार जाणून घेऊया …

भारतीय टीव्ही ब्रँड Shinco ने अ‍ॅमेझॉन वर एक खास ऑफर जाहीर केली असून त्या अंतर्गत कंपनीचा 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही अवघ्या 3,232 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या टीव्हीचा मॉडेल नंबर SO328AS आहे आणि त्याची फ्लॅश विक्री 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता अ‍ॅमेझॉन वर होईल. या विक्रीदरम्यान 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही स्टॉक बाकी असताना केवळ 3,232 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

Shinco च्या या 32-इंच स्मार्ट टीव्हीला अँड्रॉइड 8 सपोर्ट आहे. याशिवाय यात A + ग्रेड पॅनेल, एचआरडीपी डिस्प्ले तंत्रज्ञान, 1 GB रॅम आणि 8 जीबी स्टोरेज आहे. या टीव्हीमध्ये 20 वॅटचे स्पीकर आणि ब्लूटूथ देखील आहे. यात 3 एचडीएमआय आणि 2 यूएसबी पोर्टसह ए -53 क्वाडकोर प्रोसेसर आहे.

टीव्हीमध्ये डिस्ने + हॉटस्टार, झी 5, सोनी लिव्ह, व्हूट, सन एनएक्सटी, जिओ सिनेमा, इरोज नाऊ, हंगामा प्ले, अल्ट बालाजी, मूव्ही बॉक्स, ब्लूमबर्ग क्विंट, द क्विंट, होमवेडा, एपिक ऑन, आपल्याला ओटीटी आणि डॉक्युबेसारखे प्लॅटफॉर्म पहायला मिळतील.

नव्या ऑफरविषयी बोलताना शिंको इंडियाचे संस्थापक अर्जुन बजाज म्हणाले, “मागील वर्षी आम्ही आमच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त Amazon च्या विक्रीत 55 इंचाचा स्मार्ट टीव्ही उपलब्ध केला. यावर्षीही आम्ही दुसर्‍या वर्धापन दिनानिमित्त 32 इंचाचा टीव्ही 3,232 रुपयांमध्ये उपलब्ध करुन देत आहोत.

Shinco च्या 4 के आणि फुल एचडी टीव्हीवरही या सेलमध्ये सूट मिळत आहे. या सेलमध्ये Shinco चा 43 इंचाचा फुल एचडी स्मार्ट टीव्ही 15,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल, तर त्याची वास्तविक किंमत 31,999 रुपये आहे. त्याचबरोबर, 43-इंचाचा 4 के टीव्ही 36,999 रुपयांऐवजी 21,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.