Amazon वर गांजा विक्रीच्या प्रकरणी SIT स्थापन, CAIT ने केले स्वागत

नवी दिल्ली : Amazon | व्यापार्‍यांची संघटना कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स म्हणजे कॅट (Confederation Of All India Traders) ने अलिकडेच ई-कॉमर्स क्षेत्रातील प्रमुख कंपनी अमेझॉन (Amazon) वर गांजा विक्री (Ganja) करण्याचा आरोप केला होता. याशिवाय कॅटने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना पत्र लिहून अमेझॉनच्या प्लॅटफॉर्मवर कथित प्रकारे मारिजुआना (Marijuana) च्या विक्रीची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक म्हणजे एसआयटी (SIT) स्थापन करण्याची विनंती केली होती.

 

आता अमेझॉनद्वारे गांजाच्या पुरवठ्याच्या बाबतीत मध्य प्रदेश सरकार (Madhya Pradesh government) ने एका एसआयटीची स्थापना केली आहे. व्यापारी संघटना कॅटने या निर्णयाचे स्वागत केले आहे. कॅटचे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल (CAT National General Minister Praveen Khandelwal) यांनी या निर्णयासाठी एमपीचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (MP Chief Minister Shivraj Singh Chouhan) आणि एमपीचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा (MP Home Minister Dr. Narottam Mishra) यांचे कौतूक केले आहे. (Amazon)

 

कॅटचे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी ट्विट करून मध्य प्रदेश सरकारचे आभार मानत म्हटले की, मध्य प्रदेश सरकारने दाखवून दिले की, सरकार कसे काम करते. कॅटने मागणी केली आहे की, या प्रकरणात इतर आरोपींना अटक करत अमेझॉनच्या अधिकार्‍यांना सुद्धा ताबडतोब अटक करण्यात यावी.

 

एमपी पोलिसांनी दाखल केला अमेझॉनविरूद्ध गुन्हा

मध्य प्रदेशातील भिंड जिल्हा पोलिसांनी ऑनलाईन गांजा विक्री रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर अमेझॉन इंडियाच्या कार्यकारी संचालकांविरूद्ध नोव्हेंबर 2021 मध्ये प्रकरण दाखल केले होते.

 

दाखल प्रकरणानुसार, अमेझॉनद्वारे स्वीटनर विकण्याच्या नावाखाली गांजा विकण्यात आला होता.
मात्र, कंपनीने एका वक्तव्यात म्हटले होते की, ते आपल्या प्लॅटफॉर्मद्वारे अवैध प्रॉडक्टच्या विक्रीला परवानगी देत नाहीत
आणि ते या प्रकरणाच्या चौकशीला मदत करतील.

 

Web Title :- Amazon | mp govt SIT formed in the case of ganja marijuana sale on amazon CAIT welcomed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा