Amazon | अ‍ॅमेझॉनवर कढीपत्त्याच्या नावाखाली गांजाची तस्करी, पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश; जाणून घ्या प्रकरण

भोपाळ : पोलीसनामा ऑनलाइन – ऑनलाइन शॉपिंगच्या जमान्यात कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी अनेकजण अ‍ॅमेझॉन (Amazon) या ऑनलाईन शॉपिंग साईटला भेट देत असतात. मात्र याच अ‍ॅमेझॉनचा (Amazon) गांजाच्या तस्करीसाठी (Marijuana Smuggling) वापर केला जाऊ शकतो याचा कोणीही विचार केला नसेल. परंतु अ‍ॅमेझॉनचा गैरवापर करुन गांजाची तस्करी होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक करुन 20 किलो गांजा जप्त केला आहे. हा प्रकार मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) उघडकीस आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅमेझॉनच्या (Amazon) वेबसाईटवरुन विशाखापट्टनम मधून (Visakhapatnam)  मध्य प्रदेशात कढीपत्त्याच्या (Curry leaves) नावाखाली गांजाची तस्करी केली जात होती. या माध्यमातून आतापर्यंत जवळपास 1 टन गांजाची तस्करी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी सूरज उर्फ कल्लू आणि पिंटू उर्फ बिजेंद्रल सिंह तोमर यांना अटक केली आहे.

Diabetes | हाता-पायांची सूज सुद्धा आहे अनियंत्रित मधुमेहाचा इशारा, ‘या’ 10 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

20 किलो गांजाची एक ऑर्डर विशाखापट्टनम वरून अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून मागवली होती. भिंड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज कुमार (Bhind district SP Manoj Kumar) यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनी सोबत बोलताना सांगितले की, मागील चार महिन्यांपासून अ‍ॅमेझॉनवरुन (Amazon) ही तस्करी सुरु होती. यामध्ये तब्बल एक टन गांजाची तस्करी करण्यात आली असून याची किंमत 1.10 कोटी रुपये आहे.

पोलिसांनी अटक केलेल्य आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांच्या टोळीतील आणखी एका सहकाऱ्याची माहिती मिळाली.
त्यालाही पोलिसांनी हरिद्वारमधून अटक केली आहे. आरोपी सूरज उर्फ कल्लू पवैया हा कढीपत्त्याच्या नावाखाली ग्वाल्हेर, भोपाळ, कोटा, आग्रा आणि इतर ठिकाणी गांजाची तस्करी करत होता.
आरोपी सूरजने एका कपड्याच्या कंपनीच्या नावाखाली हर्बल उत्पादनं (Herbal products) आणि कढीपत्ता
उत्पादनाच्या विक्रिच्या नावाखाली रजिस्ट्रेशन केले होते. त्यानंतर त्याला अ‍ॅमेझॉनवर बारकोड मिळाला होता.

CAIT इंडियाकडून दखल

CAIT चे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भारतीया (BC Bhartia) आणि सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल (Praveen Khandelwal) म्हणाले की, विक्रेत्याची नोंदणी करण्यापूर्वी अ‍ॅमेझॉनने विक्रेत्याची खरी आणि विश्वासर्हता जाणून
घेण्यासाठी KYC करायला हवे होते.
तसेच अ‍ॅमेझॉनने गांजा सारख्या बेकायदेशीर वस्तूंच्या विक्रीला परवानगी दिली नसावी.
एवढी मोठी कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग वापरून बेकायदेशीर वस्तूंचे व्यवहार का थांबवत
नाही हे आम्हाला समजत नसल्याचे सांगितले.

हे देखील वाचा

Babasaheb Purandare | ज्येष्ठ इतिहासकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं पुण्यात निधन

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Amazon | police busted online marijuana smuggling racket using amazon in madhya pradesh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update