Tandav : मेकर्सनी माफी मागितल्यानंतरही ‘तांडव’ सुरूच ! FIR दाखल

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड अ‍ॅक्टर सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अ‍ॅक्ट्रेस डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) यांची तांडव (Tandav) या अ‍ॅमेझॉन प्राईमवरील वेब सीरिजच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. लखनऊच्या हजरतगंज पोलीस ठाण्यानंतर आता ग्रेटर नोएडाच्या राबूपुरा ठाण्यात वेब सीरिजचे डायेरक्टर अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar), प्रोड्युसर, अ‍ॅक्टर सैफ अली खान, सुनील ग्रोवर, डिंपल कपाडिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे.

कोणत्या कलमांतर्गत दाखल केला गुन्हा ?
आयपीसीमधील कलम 153ए, 295, 505 अंतर्गत वेब सीरिजवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय आयटी अ‍ॅक्टमधील काही कलमं सुद्धा सीरिज आणि मेकर्सवर लावण्यात आली आहेत. सीरिजमधील काही भाग हा ग्रेटर नोएडामध्ये शुट करण्यात आला होता जो भाग या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो जिथं तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तक्रारीत तांडव सीरिजचे डायरेक्टर अली अब्बास जफर, प्रोड्युसर, अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ कॉन्टेंट हेड, अ‍ॅक्टर सैफ अली खान, सुनील ग्रोवर, डिंपल कपाडिया यांच्या नावांचा समावेश आहे. इतकंच नाही तर डिंपल कपाडिया सहित एकूण 7 लोक या एफआयआर मध्ये आरोपी असल्याचं सांगण्यात आलं आहे. सीरिजमधील काही सीन्स आणि डायलॉगवरून जबरदस्त वाद आणि गोंधळ सुरू आहे.

CAIT नं लिहिलं जावडेकरांना पत्र
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (Confederation Of All India Traders – CAIT) नं तांडव वादाबद्दल केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहिलं आहे. त्यांनी अशी मागणी केली आहे की, या सीरिजच्या प्रसारणावर ताबडतोब बंदी घातली जावी आणि अ‍ॅमेझॉनवर कायदेशीर कारवाई केली जावी. याशिवाय या पत्रात ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी सेन्सर बोर्डाप्रमाणे एक बोर्ड बनवला जावा जो प्रसारीत होणारा कंटेट पाहूनच त्याला ग्रीन सिग्नल देईल. जर असं केलं नाही तर ज्या प्रमाणे ओटीटी लोकांच्या जीवनात शिरला आहे तो देशाच्या संस्कृती आणि सभ्यता यांच्यात मोठं विष कालवेल.

23 जानेवारी रोजी होणार सुनावणी
तांडव सीरिज विरोधात दिल्लीच्या पटीयाला हाऊस कोर्टात देखील अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जात तांडव सीरिज आणि सीरिजची टीम ज्यात अली अब्बास जफर, अपर्णा पुरोहित, हिमांशु कृष्ण मेहरा, गौरव सोळंकी, सैफ अली खान, मोहम्मद जीशान अय्युब, गौहर खान यांचा समावेश आहे. त्यांच्या विरोधात खटला दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. 23 जानेवारी रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

मेकर्सनी मागितली माफी
सीरिजमुळं निर्माण झालेला वाद पाहिल्यानंतर डायरेक्टर अली अब्बास जफर यांनी यासाठी माफी मागितली आहे. त्यांनी ट्विटरवरून एक पोस्ट शेअर केली आहे. जफर यांनी ट्विटरवरून एक पोस्ट शेअर करत त्यांचं स्टेटमेंट जारी केलं आहे. या सीरिजची पूर्ण स्टोरी ही काल्पनिक आहे आणि कोणत्याही घटनेसोबत त्याची तुलना म्हणजे योगयोग आहे असंही त्यांनी सांगितलं आहे. त्यांनी एक लांबलचक नोट लिहिली आहे.