अ‍ॅमेझॉनच्या जंगलात भीषण ‘आग’, अखेर का यावर लक्ष केंद्रीत करण्यास विनंती करत आहेत बॉलिवूड स्टार्स ?

पोलीसनामा ऑनलाईन टीम – दक्षिण अमेरिकन देश ब्राझीलमध्ये अ‍ॅमेझोनच्या जंगलात भीषण आग लागली आहे. हे जगातील सर्वात मोठं रेन फॉरेस्ट आहे. तसं तर इथे आधीही अनेकदा आग लागली आहे. परंतु यावेळेस हे प्रकरण इतकं वाढलं आहे की, ब्राझीलचं साओ पाउलो धुरामुळे अंधारमय झालं आहे.

अ‍ॅमेझॉनचं जंगल प्लॅनेटवरील 20 टक्के ऑक्सिजन क्रिएट करतं. येथे 16 दिवसांपासून आग लागली आहे. ही पर्यावरणसाठी चिंतेची बाब आहे. या प्रकरणावर अद्याप इंटरनॅशनल मीडियानेही लक्ष केंद्रीत केलेले नाही. या घटनेबाबत अनेक सेबेब्रिटींनी आवाज उठवला आहे. मीडियाला यावर फोकस करण्यासाठी विनंतीही त्यांनी केली आहे.

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि बॉलिवूड स्टार अनुष्का शर्माने जंगलात लागलेल्या आगीचा फोटो इंस्टावर शेअर करत लिहिलं आहे की, “अ‍ॅमेझॉनचं जंगल मागील आठवड्यापासून जळत आहे. ही खरंच भीतीदायक बातमी आहे. मी अपेक्षा करते मीडिया यावर जास्त लक्ष केंद्रीत करेल.”

दिशा पाटनी म्हणते की, “भयावह आहे अ‍ॅमेझॉनच्या जंगलातील आग. अ‍ॅमेझॉनचं जंगल प्लॅनेटवरील 20 टक्के ऑक्सिजन क्रिएट करतं. 16 दिवसांपासून येथे आग लागली आहे. मीडिया याचं कव्हरेज का करत नाहीये ?”

You might also like