अ‍ॅमेझॉन आता फूड ‘डिलीव्हरी’ देखील करणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अ‍ॅमेझॉन या विदेशी कंपनीवरून तुम्ही अनेकदा शॉपिंग केली असेल आणि वस्तूंची होम डिलिव्हरी सुद्धा मागवली असेल. ग्राहकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता अ‍ॅमेझॉन आता फूड डिलीव्हरी क्षेत्रातही उतरणार आहे. कंपनीने हॉटेलांना आपल्यासोबत जोडायला सुरूवात केली आहे.

दिवाळीपासून अमेझॉन आपल्या फूड डिलिव्हरीच्या नव्या व्यवसायाला बँगलोरमधून सुरुवात करणार असल्याचे बोलले जात आहे. कंपनी आपल्या ग्राहकांकडून रिपीट ऑर्डर मिळावी यासाठी ग्राहकांना चांगल्या ऑफर देणार आहे आणि याच माध्यमातून ग्राहकांची संख्या कशी वाढेल याकडे लक्ष देणार आहे.

येत्या काळात कंपनी फार्मा डिलिव्हरी आणि सौंदर्यप्रसाधनांच्या क्षेत्रातही उतरणार असल्याची माहिती मिळतीय. फ्रेशमेन्यू, क्लाउड, फूडपांडा, मॅक्डोनाल्ड, डॉमिनोज अशा मोठ्या कंपन्यांशी अमेझॉनने करार केला आहे. फूड डिलिव्हरीमध्ये अमेझॉनला उबर इट्स आणि झोमॅटो सारख्या कंपन्यांना सामोरे जावे लागणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like