Amazonनं ‘कोरोना’ व्हायरसबद्दल खोटे दावे करणारी 10 लाखाहून अधिक उत्पादने काढली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  अमेझॉन(Amazon) ने माहिती दिली आहे की त्यांनी १० लाख पेक्षा अधिक प्रॉडक्ट्स हटवले आहेत. हे प्रॉडक्ट्स कोरोना विषाणूबद्दल दिशाभूल करणारा दावा करत होती. एका टीव्ही वाहिनीशी झालेलया बातचितीदरम्यान कंपनीच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली. १० लाखाहून अधिक उत्पादने काढून टाकण्याबरोबरच कंपनीने थर्ड-पार्टी व्यापाऱ्यांकडून हजारो ऑफर्स रद्द किंवा निलंबित केल्या आहेत. या व्यापाऱ्यांवर ग्राहकांकडून चुकीची किंमत आकारण्याचा आरोप होत होता.

कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, जे लोक उत्पादनासाठी चुकीची किंमत घेतात त्यांच्यासाठी अमेझॉन (Amazon)मध्ये जागा नाही. कंपनीने असे म्हटले आहे की उचित मूल्य निर्धारणाविषयीचे आमचे दीर्घकालीन धोरण स्पष्टपणे सांगते की आम्ही ग्राहकांच्या आत्मविश्वासाला हानी पोहचविणाऱ्या किंमतींना परवानगी देत नाही.

कंपनीने म्हटले आहे की, कंपनी प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवणे चालूच राहणार आहे. किंमत वाढीवरील धोरणांचे उल्लंघन करणार्‍या ऑफर काढल्या जातील. कोरोना व्हायरस बाबत भ्रमित करणारे दावे करून प्रॉडक्ट विकणाऱ्या अकाउंट्सना निलंबित केले जाईल किंवा पूर्णपणे काढून टाकले जाईल.

याशिवाय अमेझॉनने आपल्या वेबसाईटवर कोरोना व्हायरस COVID-19, n95 मास्क आणि त्याच्याशी संबंधित सर्चेस मध्ये एक नोटीस जारी केली आहे. जी नोटीस कोरोनाविषयी माहिती देणारी आहे. ही नोटीस युजरला थेट ‘सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंन्शन’ वेबसाइट ला जोडते.

अमेझॉनने (Amazon) फेब्रुवारीमध्ये कॅलिफोर्नियामधील मेनलो पार्क येथे फेसबुकने आयोजित केलेल्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (WHO) बैठकीच भाग घेतला होता. बैठकीत प्रत्येकाने कोरोनो व्हायरसविषयी चुकीची माहिती कशी टाळायची यावर चर्चा केली.