आता अ‍ॅमेझॉन देखील उतरणार ‘फूड डिलीव्हरी’ मार्केटमध्ये

बेंगळुरू : वृत्तसंस्था – घर बसल्या फूड डिलिव्हरीद्वारे फूड सेवा पुरविले जाते. या सेवेला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. स्वीगी झोमॅटो, उबेर इट्स यानंतर आता फूड डिलिव्हरीच्या क्षेत्रात अमेझॉननेही एंट्री केली आहे. ऍमेझॉन सध्या ई विक्री क्षेत्रात दमदार कामगिरी करत आहे. अ‍ॅमेझॉनच्या एन्ट्रीमुळे फूड डिलिव्हरी क्षेत्रात चांगलीच स्पर्धा पहायला मिळणार आहे.

अमेझॉन करणार उबेर इट्सची खरेदी ?

भारतात ऑनलाइन फूड सर्व्हिसचा व्यापार वाढत आहे. ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात या अ‍ॅप्सचा वापर केला जातो. एका अहवालानुसार ऑनलाइन जेवण ऑर्डर करणाऱ्यांच्या संख्येत १७६ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळं अ‍ॅमेझॉनही या क्षेत्रात उतरली आहे. अ‍ॅमेझॉन उद्योजक नारायण मूर्ती यांच्या कॅटामारन कंपनीसोबत भागीदारी करण्यार असल्याचं बोललं जात आहे. तर एकीकडे अ‍ॅमेझॉन उबेर इट्स खरेदी करणार असल्याची चर्चा आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅमेझॉमनं या नवीन व्यवसायासाठी कर्मचाऱ्यांची भरती करण्यास सुरुवात केली आहे. सप्टेंबर महिना हा सण- उत्सवाचा असतो. हेच लक्षात घेऊन अ‍ॅमेझॉननं नव्या व्यवसायचा श्रीगणेशा करण्यासाठी सप्टेंबर महिना निवडला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –