फायद्याची गोष्ट ! 1 मार्चपासून Amazon चा नवा ‘सेल’, AC- फ्रिजवर मिळणार 40 टक्क्यांपर्यंत ‘सूट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेझॉनने आपल्या वॉव सॅलरी डेज सेलची घोषणा केली आहे. हा सेल 1 मार्चपासून सुरू होत असून 3 मार्चपर्यंत चालणार आहे. या सेलदरम्यान ग्राहकांना अनेक प्रॉडक्टसवर डिल्स आणि डिस्काउंट्स मिळेल. सेलमध्ये एसी-फ्रिजवर 40 टक्केपर्यंत सूट ग्राहकांना मिळणार आहे.

अमेझॉनने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे की, ग्राहक Samsung, LG, Sony, Fujifilm, Panasonic, Sanyo आणि TCL सारख्या अनेक कंपन्यांच्या प्रॉडक्टसवर ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात. इच्छुक ग्राहक अमेझॉन इंडियाच्या वेबसाईटवर जाऊन काही डिल्स पाहू शकतात. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे Sony, Fujifilm आणि Panasonic सारख्या कंपन्यांचे मिररलेस कॅमर्‍यावर 2833 रुपये प्रती महीना प्रारंभिक किमतीवर नो-कॉस्ट EMIचा ऑप्शन देण्यात येत आहे. तर, TP Link, Qubo आणि CP Plusच्या सिक्युरिटी कॅमर्‍यावर 1,349 रुपयांच्या प्रारंभिक किमतीत उपलब्ध आहेत.

अशाप्रकारे ग्राहक अन्य अनेक इलेक्ट्रॉनिक आयटम्सवर सुद्धा डिस्काउंटचा लाभ घेऊ शकतील. ग्राहकांना Boat, JBLआणि Boseच्या ब्लूटूथ स्पीकर्सवर 50 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. तर, या कंपन्यांच्या साउंडबार्सवर ग्राहक 40 टक्केपर्यंत सूट मिळवू शकतात.

अमेझॉनच्या या नव्या सेलमध्ये ग्राहक स्मार्ट टीव्ही मॉडेलच्या रेंजवर 50 टक्केपर्यंत सूट मिळवू शकतात. सेलमध्ये Samsung, LG, Sanyo आणि TCLच्या टीव्ही मॉडेल्सचर सुद्धा ऑफर्स आहेत. लार्ज अप्लायन्सेसवर 60 टक्केपर्यंत आणि एसी आणि रेफ्रिजरेटर्सवर 40 टक्केपर्यात सूट मिळणार आहे.