Ambadas Danve | ‘आमची चिंता आम्ही करु’, अमृता फडणवीसांच्या ट्विटला अंबादास दानवेंचे प्रत्युत्तर

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) शिवसेनेचे अधिकृत निवडणूक चिन्ह धनुष्यबाण (Shivsena Dhanushyaban Symbol) गोठवल्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. यावरुन शिवसेना चांगलीच आक्रमक झाली असून शिंदे गटासह भाजपवर (BJP) घणाघाती टीका केली जात आहे. यातून शिंदे गट (Shinde Group) आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. यासर्व घडामोडींमागे भाजपचा हात असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येत आहे. यावरुन आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. या टीकेला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ( Ambadas Danve) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमची चिंता आम्ही करु असे म्हणत अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी टोला लगावला आहे.

 

भाजप आणि शिंदे गटाकडून शिवसेना आणि महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) प्रत्युत्तर दिले जात आहे. याच दरम्यान अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे गटाला खोचक टोला लगावला आहे. अमृता फडणवीसांच्या या टीकेला अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी अकोल्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिले. आमची चिंता आम्ही करु, त्यांनी काय-काय गमावलंय, पती मुख्यमंत्रीपदावरुन उपमुख्यमंत्रीपदावर आले आहेत, असा टोला दानवे यांनी अमृता फडणवीस यांना लगावला.

 

 

अब्दुल सत्तार ही एक विकृती

अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्याकडून मुख्यमंत्र्यांच्या पीएला शिवीगाळ झाली, यासंदर्भात विचारणा केली असता, अब्दुल सत्तार ही एक विकृती आहे, ते कुठेही गेले तरी तसेच वागणार असा टोला दानवे यांनी सत्तारांना लगावला. तसेच त्यांनी आता फक्त मुख्यमंत्र्यांच्या पीएला शिवीगाळ केली आहे. पुढे आणखी कुणाकुणाला करतील हे दिसेलच, असंही दानवे म्हणाले.

 

काय म्हटले होते अमृता फडणवीस यांनी ?

अमृता फडणवीस यांनी एक ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का नेमका कशाचा बसलाय, असे तुम्हाला वाटते,
असा प्रश्न विचारत अमृता फडणवीस यांनी चार पर्याय दिले आहेत.
पहिला पर्याय म्हणजे पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह गोठवणे, दुसरा पर्याय 40 आमदार (MLA) आणि 12 खासदार (MP) गमावणे,
तिसरा पर्याय प्रदीर्घ काळापासून असलेला भाजपसारखा निष्ठावान युती भागीदार गमावला आणि चौथा पर्याय म्हणजे कट्टर उजव्या विचारसरणींचा हिंदू पक्ष असल्याची ओळख गमावणे,
असे चार खोचक पर्याय देत अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचले होते.

 

Web Title :- Ambadas Danve | abdul sattar is distortion criticizes ambadas danve
also taunts amrita fadnavis over her tweet

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा