Ambadas Danve | अंबादास दानवेंचा भाजपला इशारा, म्हणाले-‘हीच शिवसेना आणि मशाल तुम्हाला…’

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी नुकतंच धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी बोलताना त्यांनी भाजप (BJP) आणि शिंदे गटावर (Shinde Group) निशाणा साधला. या सरकारमधील मंत्र्यांचा शेतकऱ्यांशी कोणतंही देणंघेणं नसल्याचा आरोप दानवे यांनी यावेळी केला. शिंदे सरकारमधील मंत्र्यांना सत्तेचा माज आला असून त्यांना शेतकऱ्यांशी काहीही देणं-घेणं नाही, असं अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले.

दरम्यान अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वी (Andheri by-Election) शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह (Dhanushyaban Symbol) आणि नाव केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) गोठवले आहे. त्यामुळे शिंदे गटाला आणि ठाकरे गट (Thackeray Group) यांना नवं नाव आणि चिन्ह देण्यात आलं आहे. यातील ठाकरे गटाच्या मशाल या चिन्हावरुनही अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. मशाल ही मजबूत हातात असून तुम्ही तुमचं कमळ सांभाळा, असा सल्ला त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना दिला.

अंबादास म्हणाले, मशाल ही मजबूत हातात आहे. तुम्ही तुमचं कमळ सांभाळा. हीच शिवसेना (Shivsena)
आणि मशाल तुम्हाला महाराष्ट्रात नेस्तनाभूत केल्याशिवाय राहणार नसल्याचा गंभीर इशाराही
विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिला आहे.
यावेळी त्यांनी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावरही निशाणा साधला.
तसेच शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून त्यांनी शिंदेच्या मंत्र्यांनाही टोला लगावला आहे.

Web Title :- Ambadas Danve | ambadas danve slams bjp over statement about thackeray group new symbol

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा