आंबाजोगाई : शेतकरी-शिक्षकाचा गौरव

आंबाजोगाई : पोलीसनामा ऑनलाइन – तालूक्यातील आपेगाव येथील ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव कै. कर्मवीर शेषराव आप्पा शिंदे यांचा नववा स्मुती समोरोह संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रयोगशिल शेतकरी व आर्दश शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव जयजीत शिंदे होते डॉ. धमाले, मुख्याध्यापक राम नागीशे, माजी मुख्याध्यापक डि. एन. कुलकर्णी, पर्यवेक्षीका व्हि. जे. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी कै. कर्मवीर शेषराव आप्पा शिंदे यांच्या नावाने दिला जाणारा आर्दश शिक्षक पुरस्कार सौंदना ता. केज येथील जिल्हा परीषद प्राथमीक शाळेचे मुख्याध्यापक जीवन जाधव यांना तर कै. दानवीर आमऋषी आबा शिंदे प्रयोगशील शेतकरी अभिमन्यू कडबाने (आबा माळी) यांना सपतीक प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी बोलतांना मुख्याध्यापक राम नागीशे यांनी आप्पांच्या विचारातील शिक्षक असणे गरजेचे आहे असे सांगीतले. सुरूवातीला कार्यक्रमाचे प्रास्तावीक व पुरस्कार प्राप्त पाहूण्यांचा परिचय प्रा. निळकंठ हजारे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुधाकर देशमुख यांनी केले तर सर्वांचे आभार सतीष घुले यांनी मानले.