अंबाजोगाई जवळ शिवशाही बसला अपघात, ४५ प्रवासी अडकले

अंबाजोगाई : पोलीसनामा ऑनलाईन

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई – केज मार्गावर एसटीची शिवशाही बस उलटल्याने अपघात झाला. सुदैवाने अपघातामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नसली तरी अनेक प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात होळ गावाजवळ आज (1 मे ) रोजी मंगळवारी सकाळी 6: ३० च्या सुमारास घडला. अपघातग्रस्त शिवशाही बस लातूरहून औरंगाबादला जात होती.

बसमध्ये तब्बल ४५ प्रवासी अडकले असून जेसीबीच्या साहाय्याने प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. यातील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून , त्यांच्या मदतीसाठी ग्रामस्थांनी धाव घेत मदतकार्य वेगाने सुरू केले आहे.
सध्या या मार्गावर रस्त्याचे काम चालू असून वाहतूकीसाठी अडथळे निर्माण होत आहेत. तसेच मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळे अपघात चे प्रमाण वाढत आहे.