Ambajogai Sugar Factory | भाजपचे रमेश आडसकर यांच्याकडून कारखान्याच्या 25 एकर जमिनीची विक्री; जाणून घ्या प्रकरण

बीड : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Ambajogai Sugar Factory | भाजप नेत्यांच्या (BJP leader) ताब्यात असणाऱ्या बीड (Beed) जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील अंबा सहकारी साखर कारखान्याची (Ambajogai Sugar Factory) 25 एक्कर जमीन विकल्याचा प्रकार समोर आला आहे. मुख्यतः म्हणजे शेतकऱ्यांच्या FRP ची रक्कम देण्यासाठी 25 एकर जमीन विकण्यास साखर आयुक्तांनी परवानगी दिली होती. मात्र जमीन विकून देखील अजून शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत. यामुळे जमीन विक्री केलेले पैसे गेले कुठं? याबाबत शेतकरी प्रश्न करत आहेत. विशेष म्हणजे भाजपा नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे खंदे समर्थक रमेश आडसकर (Ramesh Adaskar) यांच्या ताब्यात हा कारखाना आहे.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील अंबा सहकारी साखर कारखानदारीच्या (Ambajogai Sugar Factory) इतिहासात पहिल्यांदाच शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे देण्यासाठी कारखान्याची 25 एकर जमीन विक्री केलीय. गतवर्षी या साखर कारखान्याला ऊस दिलेल्या शेतकऱ्यांना अजून ‘FRP ची रक्कम मिळाली नाही. या कारखान्यात उसापासून फक्त साखर बनली, असं नाही तर विविध उपपदार्थही बनले. तरी देखील शेतकऱ्यांचे पैसे का दिले नाहीत? असा सवाल शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट (Kalidas Apet) यांनी उपस्थित केलाय. तर कारखान्याच्या जमीन विक्रीचा व्यवहार संशयास्पद असून यात आर्थिक अफरातफर झालीय. यामुळे हा आदेश मागे घेण्याची मागणी केलीय.

7 जून 2021 रोजी अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याला (Ambajogai Sugar Factory) साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी अटी आणि शर्ती घालून शेतकऱ्यांच्या FRP. ची रक्कम देण्यासाठी 25 एकर जमीन विकण्याची परवानगी दिली होती. शेतकऱ्यांच्या FRP चे पैसे व्याजासह न मिळाल्यामुळे साखर आयुक्तांनी घातलेल्या अटींचे अंबासाखरने उल्लंघन केल्याचं स्पष्ट होतंय.
म्हणून संबंधित प्रकाराची गंभीर दखल घेऊन साखर आयुक्तांनी जमीन विक्रीला लवकर स्थगिती द्यावी.
याबाबत मागणी शेतकरी संघटनेचे भाई मोहन गुंड (Bhai Mohan Gund) यांनी केलीय.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

 

दरम्यान, शेतकऱ्याच्या FRP चे पैसे देण्यासाठी आम्ही 25 एकर जमीन विकली आहे.
परंतु, त्यातील १ रुपयाही इकडे तिकडे गेलेला नाही.
यातून शेतकऱ्यांच्या उसाची थकीत बिलं देण्यात आलीत.
तर हा व्यवहार पारदर्शक झाला असून कारखान्यावर प्रशासक नेमल्यानंतर कारखान्याला कुठल्याही बँकेनं कर्ज दिलं नाही.
म्हणून सभासदांच्या ठेवीमधून हा कारखाना चालू ठेवलाय,
यातून शेतकऱ्यांचा लाभ मिळावा हाच मुख्य उद्देश असल्याचे भाजपा नेते आणि चेअरमन रमेश आडसकर (Chairman Ramesh Adskar) यांनी सांगितलं.

या दरम्यान, अनेकदा शेतकऱ्यांचे पैसे न दिल्याने साखर कारखाना हस्तांतर करण्याची अथवा कारखाना विकण्याची वेळ अनेकांवर आलीय.
मात्र, आता थेट जमिनी विकण्याचा पायंडा पडत आहे.
असं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
तसेच कारखाना तोट्यात दाखवून सहकाराचा स्वाहाकार करण्याची नीती राजकीय नेत्यांनी अवलंबली आहे.
असा प्रकारही समोर येत असल्यानं चिंता व्यक्त केलीय.

Web Title : Ambajogai Sugar Factory | 25 acres land of amba sahakari sugar factory sold by bjp leader in ambajogai beed