PM मोदींनी केलं राफेलचं स्वागत, संस्कृत श्लोकातून लिहीला ‘हा’ खास संदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात शक्तिशाली लढाऊ विमानांपैकी एक राफेलची भारतात लँडिंग होत आहे. सोमवारी फ्रान्समधून उड्डाण घेतल्यानंतर बुधवारी 5 राफेल विमानांनी अंबाला एअरबेसवर लँडिंग केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून राफेल विमानांचे स्वागत केले. विशेष म्हणजे पीएम मोदींनी राफेल विमानांचे संस्कृत श्लोकासह स्वागत केले. पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये लिहिले आहे, “राष्ट्र रक्षाम प्यानम, राष्ट्र रक्षासम व्रत, राष्ट्र रक्षासंघ यज्ञो, दृष्टो नैव च नैव च।। नभ: स्पृशं दीप्तम्…स्वागतम् ”

याचा अर्थ असा की, राष्ट्र रक्षणासारखे कोणतेही पुण्य नाही, राष्ट्राच्या संरक्षणासारखे कोणते व्रत नाही, राष्ट्ररक्षासारखे बलिदान नाही. दरम्यान, नभ: स्पृशं दीप्तम् भारतीय हवाई दलाचे आदर्श वाक्य आहे. ‘ नभ:स्‍पृशं दीप्‍तमनेकवर्ण व्‍यात्ताननं दीप्‍तविशालनेत्रम्। दृष्‍ट्वा हि त्‍वां प्रव्‍यथ‍ितान्‍तरात्‍मा धृतिं न विन्‍दामि शमं च विष्‍णो।।’

पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटमध्ये ज्या गोष्टी बोलल्या त्या त्यांनी एका भाषणात नमूद केल्या. पंतप्रधान म्हणाले की, राष्ट्र रक्षा समं पुण्यं, राष्ट्र रक्षा समं व्रतम, राष्ट्र रक्षा समं यज्ञो, दृष्टो नैव च नैव च।। याचा अर्थ असा की, मला राष्ट्रीय संरक्षण यासारखे कोणतेही पुण्य दिसत नाही, किंवा राष्ट्रीय संरक्षणासारखे कोणतेही व्रत नाही किंवा राष्ट्रीय संरक्षणासारखे कोणतेही बलिदान मला दिसत नाही.

संरक्षणमंत्र्यांनीही केले स्वागत
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही राफेल विमानांचे स्वागत गेले. राजनाथ सिंह यांनी लिहिले की, नवीन विमाने अंबाला येथे दाखल झाली आहेत. राफेल विमान भारतीय वायुसेनेच्या प्रत्येक मार्गाने गरजा भागवतात.या विमानांबद्दल केलेल्या आरोपांचे उत्तर यापूर्वीच देण्यात आले आहे, ते म्हणाले कि, राफेल ढाऊ विमान नव्या युगाची सुरुवात आहे.