आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत अंबानी अव्वल तर अदानी दुसऱ्या स्थानी; जाणून घ्या संपत्ती

पोलीसनामा ऑनलाइन – आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी प्रथम क्रमांक तर अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी दुसरे स्थान मिळवले आहे. अदानी यानी चीनमधील उद्योजक झोंग शानशान यांना मागे टाकत दुसरा क्रमांक मिळविला आहे. ब्लुमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार शेअर बाजारात अदानी समुहाच्या समभागांची म्हणजेच शेअर्सची मागणी वाढल्याने त्यांनी सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसरे स्थान मिळवले आहे. अंबानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 13 व्या स्थानी आहेत. तर अदानींनी 14 व्या क्रमांकावर आहेत.

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत झोंग हे फेब्रुवारीपर्यंत पहिल्या स्थानी होते. मात्र अंबानी यांनी त्यांना मागे टाकून पहिले स्थान मिळवले आहे. यंदा अंबानींना 175 .5 मिलियन अमेरिकन डॉलर्सचे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे अदानींच्या एकूण संपत्तीत 32.7 बिलियन अमेरिकन डॉलर्सने वाढ झाली आहे. अदानींची एकूण संपत्ती 66.5 बिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहचली असून झोंग यांची एकूण संपत्ती 63.6 बिलियन अमेरिकन डॉलर इतकी आहे. अंबांनींची एकूण संपत्ती 76.5 बिलियन डॉलर्स इतकी आहे. संपत्तीत भर होण्याच्या बाबतीत अदानींनी अंबानी तसेच टेस्लाचे एलन मस्क यांनाही मागे टाकले आहे. अदानी यांची निव्वळ मालमत्ता वर्ष 2021 मध्ये आतापर्यंत 16.2 अब्ज डॉलरने वाढून 50 अब्ज डॉलर झाल्याचे एका अहवालात म्हटले होते. ब्लूमबर्गच्या अब्जाधीशांच्या निर्देशांकांमध्ये अदानीचे नाव संपत्ती भर टाकण्यात अग्रणी आहे. त्यांनी टेस्लाच्या मस्कना यांनाही याबाबत मागे टाकले आहे. मस्कना यांची याबाबत अ‍ॅमेझॉनच्या जेफ बेझोस यांच्याशीही स्पर्धा राहिल्याचे दिसून आले आहे. अदानी समूहातील जवळपास सर्वच लिस्टेट कंपन्यांचे बाजारमूल्य चालू वर्षात थेट 50 टक्क्यांपर्यंत झेपावले आहे.