आर्थिकमनोरंजनमुंबई

Ambani Family | अंबानी कुटुंबाला बॉलिवूडच्या टॉपच्या ‘या’ कलाकारामुळे करोडो रुपयांचा फटका, का होतेय एकच चर्चा?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंबानी कुटुंबाचं (Ambani Family) आणि बॉलिवूड कलाकारांचं (Bollywood Actors) एक खास कनेक्शन आहे. अनेकदा मोठ मोठे सेलिब्रिटी अंबानी कुटुंबाच्या (Ambani Family) पार्ट्यांना न चुकता हजेरी लावत असतात. बॉलिवूडमधील टॉपचे कलाकारांचे सिनेमे देखील मुकेश अंबानी (Mukesh Ambani) प्रोड्यूस करताना पहायला मिळतात. रिलायन्स एंटरटेनमेंट (Reliance Entertainment) अंतर्गत आतापर्यंत अनेक सिनेमे प्रदर्शीत झाले आहेत.

रिलायन्स कंपनीचे (Reliance Company) प्रमुख मुकेश अंबानी यांच्या संपत्तीची संपूर्ण जगाला माहिती आहे. अंबानी कुटुंबाची जगभरात एक खास ओळख आहे. मुकेश अंबानी हे बिझनेस जगतातील एक मोठं नाव आहे. त्यांची अनेकदा सोशल मिडियात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, मात्र, त्यांचे कुटुंब (Ambani Family) देखील अनेकदा सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. खासकरुन मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी (Nita Ambani) चर्चेत असतात.

पण आता एका अभिनेत्यामुळे अंबानी कुटुंब चांगलेच चर्चेत आले आहे. या सेलिब्रिटी मुळे अंबानी कुटुंबाला करोडो रुपयांचे नुकसान (Loss) झाले आहे. एका रिपोर्टनुसार, सध्या सर्वत्र रणवीरची खिल्ली उडवली जात आहे. अंबानी यांनी रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) चित्रपटावर खर्च केलेला पैसा त्यांना परत मिळण्याची शक्यता आता संपली आहे. रणवीर सिंगचा सिनेमा 83 आता बॉक्स ऑफिसवर (Box Office) पूर्णपणे पडला आहे.

125 कोटी रुपयांची गुंतवणूक

अनिल अंबानींच्या रिलायन्स एंटरटेनमेंटने या चित्रपटासाठी 125 कोटी रुपये गुंतवले होते अशी चर्चा आहे. हा बिग बजेट सिनेमा (Big Budget Movies) प्रतर्शित झाल्यानंतर 4 ते 5 दिवसांत पूर्ण पैसे कमावेल आणि नंतर चांगला नफा मिळेल अशी अपेक्षा सर्वांना होती मात्र तसे काही झालेच नाही. पण याउलट घडले. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी केवळ निर्मात्यांनाच नाही तर सर्वसामान्य प्रेक्षकांनाही तो बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल असे वाटले होते.

मात्र या चित्रपटावर जेवढी रक्कम खर्च झाली आहे ती देखील मिळणे आता शक्य नाही. रिलीज झाल्यापासून या चित्रपटाने केवळ 59 कोटी रुपयांची कमाई केली आहे. रणवीर सिंगने अंबानी कुटुंबाला दिलेला हा करोडोंचा धक्का असल्याचे बोलले जात आहे. वास्तविक हा चित्रपट 2021 मधील सर्वात ब्लॉकबस्टर चित्रपट (Blockbuster Movies) असेल अशी अपेक्षा होती.

रणवीर सिंगला सर्वाधिक फटका

हा चित्रपट चांगली कमाई करेल अशी अपेक्षा निर्मात्यांना होती.
पण इतकी मागणी असूनही सर्व आशा धुळीला मिळाल्या आणि चित्रपट चांगली कमाई करु शकला नाही.
83 चित्रपट फ्लॉप झाल्याने चित्रपटाचा मुख्य अभिनेता रणवीर सिंगला याला सर्वाधिक फटका बसला आहे.
एका रिपोर्टनुसार, आता रणवीर सिंगच्या फिसमध्ये देखील कपात होणार आहे.
असं बलोलं जात होतं की, चित्रपटाच्या 200 कोटींच्या फिस व्यतिरिक्त रणवीर सिंगला रिलीज नंतरच्या नफ्यातील वाटाही हवा होता.
पण तसं घडू शकले नाही.

Web Title :-  Ambani Family | ambani family big loss because of actor ranveer singh know in details

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Coronavirus Restrictions In Maharashtra | … तर वॉईन शॉप, दारुची दुकाने बंद करणार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा इशारा

 

Pune Crime | खराडीत 2 कुटुंबात झाली हाणामारी, 7 जणांवर गुन्हा ! भांडणामागचे कारण ऐकून तुम्ही व्हाल हैराण

 

Girish Mahajan | गिरीश महाजन ‘गोत्यात’? पुणे पोलिसांचे 50 जणांचे पथक जळगावात दाखल; जाणून घ्या प्रकरण

Back to top button