वकिलाचा दावा : API सचिन वाझे यांची अटक पूर्णपणे बेकायदेशीर !, जाणून घ्या कोर्टात नेमकं काय घडलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेली स्कॉर्पिओ सापडल्याच्या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना 13 तासांच्या चौकशी नंतर अटक करण्यात आली. आज त्यांना एनआयए कोर्टात हजर केले असता त्यांना 25 तारखेपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्या आली. एनआयएने सचिन वाझे यांच्या 14 दिवसांच्या कोठडीची मागणी न्यायालयाकडे केली होती. मात्र न्यायालयाने केवळ दहा दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सचिन वाझे यांना झालेली अटक ही पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा दावा वाझे यांच्या वकिलांनी केला आहे.

न्यायालयात काय घडलं ?
सचिन वाझे यांच्या वकिलाने न्यायालयात युक्तीवाद करताना म्हटले की, ही संपूर्ण बाब संशयाच्या आधारे असल्याने वाझे यांना झालेली अटक पूर्णपणे बेकायदेशीर आहे. कारण गुन्हेगारी कायदा असे म्हणत नाही की एजन्सीने संशयावरुन कोणालाही अटक केली पाहिजे. असे कोणतेही प्राथमिक प्रकरण वाझे यांच्या विरोधात नाही. वाझे यांना करण्यात आलेली अटक ही घाईघाईने व मनमानी पद्धतीने करण्यात आली असल्याचा दावा वकिलांनी केला.

सचिन वाझे यांना अटक करण्यापूर्वी एनआयएने प्रोसीजर फॉलो केलेली नाही. वाझे यांना कोणत्या आधारावर अटक करण्यात आली, हे देखील त्यांना सांगण्यात आलेले नाही. अटके संदर्भात त्यांना सांगणे एनआयएचे कर्तव्य आहे. तसेच त्यांना त्यांच्या कुटुंबियांशी बोलण्याची परवानगी नव्हती आणि कायदेशीर मदत घेण्यास देखील परवानगी नव्हती, असा खुलासा वाझे यांच्या वकिलांनी न्यायालयात केला.

काय म्हणाले एनआयएचे वकील ?
सचिन वाझे यांच्या वकिलांनी न्यायालयात युक्तीवाद केल्यानंतर एनआयने न्यायालयात चौकशीची कागदपत्रे सादर केली. यामध्ये साक्षीदारांची विधाने, सीडीआरशी संबंधित माहिती, सीसीटीव्ही आणि इतर कागदपत्रे अशी माहिती एनआयएच्या वकिलांनी दिली.

सोमवारी न्यायालयात या दोन गोष्टी घडू शकतात
सत्र न्यायालय- वाझे यांच्या वकीलांना सुनावणीदरम्यान वाझे यांना झालेली अटक ही पूर्णपणे बेकायदेशी असल्याचे ठरवले आहे. अशा प्रकरणात कोर्टाने एनआयएला उद्या माहिती देण्यास सांगितले आहे.

मुंबई उच्च न्यायालय – सचिन वाझे यांच्या वकिलांनी वाझे यांच्या अटकेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. हे प्रकरण उद्या (सोमवार) बोर्डावर सुनावणीसाठी येऊ शकते.