Pune : 100 देशांच्या राजदूतांचा पुणे दौरा तात्पुरता रद्द

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना लशीच्या पार्श्वभूमीवर तब्बल शंभर देशांचे राजदूत पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट व जिनोव्हा बायो-फार्मासिटिक्युअल्स कंपनीला 4 डिसेंबर रोजी भेट देणार होते. परंतु राजदूतांचा हा दौरा तात्पुरता रद्द केला (ambassadors-100-countries-temporarily-cancelled-their-visit-pune) आहे. दौरा निश्चित झाल्यावर पुन्हा कळविण्यात येईल, असे लेखी पत्र आल्याचे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी सांगितले आहे.

इंग्लंडमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत संशोधित होणाऱ्या कोरोनावरील लशीच्या उत्पादनाचे हक्क पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने मिळवले आहेत. ऑक्सफोर्डच्या लशीच्या प्राथमिक चाचण्या समाधानकारक आल्या आहेत. त्यामुळे लस उत्पादनाची जगातली सर्वांत मोठी क्षमता असल्याने ‘सिरम’कडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर तब्बल शंभर देशांचे राजदूत येत्या 4 डिसेंबर रोजी पुणे दौ-यावर येणार होते. राजदूत येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील शनिवारी (दि.28) तातडीने पुणे दौऱ्यावर येत असून, सिरम इन्स्टिट्यूटमधील लशीचे उत्पादन व वितरण याचा आढावा घेणार आहेत. परंतु आता राजदूतांचा पुणे दौरा तात्पुरता रद्द झाला आहे.

You might also like