Ambati Rayudu Retirement | चेन्नईचा विस्फोटक फलंदाज अंबाती रायडूची निवृत्तीची घोषणा, IPL मधील गुजरातविरुद्धचा अंतिम सामना खेळणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Ambati Rayudu Retirement | आयपीएलच्या (IPL) 16 व्या मोसमाचा अंतिम सामना थोड्याच वेळात चेन्नई सुपर (Chennai Super Kings (CSK) किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स (Gujarat Titans (GT) यांच्यात होत आहे. या मोसमाचा विजेता कोण? अशी चर्चा रंगत असतानाच चेन्नईचा विस्फोटक फलंदाज अंबाती रायडू याने निवृत्तीची घोषणा (Ambati Rayudu Retirement) केली आहे. अंबाती रायडू याने ट्वीट करत निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली.
अंबाती रायडूने ट्वीटमध्ये लिहिले, CSK आणि गुजरात 2 सर्वोत्तम संघ, 2024 सामने, 14 हंगाम, 11 प्लेऑफ, 8 फायनल, 5 ट्रॉफी. आशेने आज रात्री सहावी. बराच लांबचा प्रवास झाला. मी ठरवले आहे की आज रात्रीचा आयपीएलमधील हा माझा शेवटचा सामना असेल. मला ही स्पर्धा खेळताना खूप आनंद झाला. तुम्हा सर्वांचे आभार. यू-टर्न नाही.
अंबाती रायडूने 2010 मध्ये आयपीएल करिअरला सुरुवात केली. चेन्नई सुपर किंग्स शिवाय त्याने
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians (MI) भाग आहे. 2018 पासून चेन्नई सुपर किंग्स कडून तो खेळत आहे.
त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 203 सामन्यांत 28.29 च्या सरासरीने 4 हजार 329 धावा केल्या आहेत.
रायडुने आयपीएलमध्ये 22 अर्धशतक आणि 1 शतक केले आहे.
तर 171 षटकार आणि 358 चौकार ठोकले आहेत. त्याशिवाय 64 झेला आणि 2 स्पपिंग त्याच्या नावावर आहेत.
Web Title : ambati rayudu retirement csk batter ambati rayudu announced retirement from ipl ahead csk vs gt final
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Vinayak Raut on CM Eknath Shinde | ‘हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…’, विनायक राऊतांचे शिंदेंना आव्हान
- Pune Crime News | Mundhwa Police Station : ‘ओरीला पब’मध्ये एन्ट्री न दिल्याच्या कारणावरून एकावर धारदार हत्याराने सपासप वार
- Maharashtra Politics News | गरज पडल्यास 48 जागा स्वबळावर लढणार, काँग्रेस नेत्याच्या दाव्याने आघाडीत खळबळ