ICC World Cup 2019 : …म्हणून अंबाती रायडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ‘निवृत्‍ती’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत जखमी झालेल्या खेळाडूंच्या जागी देखील संधी न मिळाल्याने नाराज झालेल्या अंबाती रायडू याने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सन्यास घेण्याची घोषणा केली आहे. वर्ल्डकपसाठी १५ जणांचा संघ निवडल्यानंतर अंबाती रायडू याला स्टॅण्डबाय खेळाडू म्हणून ठेवण्यात आले होते, त्यामुळे कोणताही खेळाडू जखमी झाल्यास त्याचा सर्वात आधी विचार केला जाईल अशी अपेक्षा होती. मात्र बीसीसायने त्याच्याजागी मयांक आगरवाल याचा विचार केला.

एकदिवसीय सामन्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी अंबाती रायडू याने लाल चेंडूच्या प्रकारातून निवृत्ती स्वीकारून आपले सर्व लक्ष एकदिवसीय सामन्यांकडे वळवले होते. मात्र या निर्णयामुळे त्याला मोठा झटका बसला होता. त्यामुळे त्याने नाराज होत अखेर आज निवृत्तीची घोषणा केली.

विजय शंकर जखमी झाल्यानंतर मयांक अगरवाल याचा भारतीय संघात समावेश करण्यात आल्यानंतर रायडूला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील करण्यात आले होते. मात्र त्याने निवृत्तीची घोषणा करताना त्याचे कारण सांगितलेले नाही. ३३ वर्षीय या खेळाडूने भारतीय संघासाठी ५५ एकदिवसीय सामने खेळले असून यामध्ये ४७. ०५ च्या सरासरीने १६९४ धावा बनवल्या आहेत. यामध्ये ३ शतक आणि १० अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याने भारतीय संघासाठी ६ टी-२० सामने देखील खेळले होते. अंबाती रायडूने जुलै २०१३ मध्ये भारतीय संघात पदार्पण केले होते. या स्पर्धेत चौथ्या क्रमांकासाठी आपली दावेदारी भक्कम करण्यासाठी त्याने प्रथमश्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र तरीदेखील त्याला संघात स्थान न देण्यात आल्याने तो निराश झाला होता.

दरम्यान, आज सकाळी आइसलँड या देशाने त्याला ट्विट करत नागरिकत्व स्वीकारण्याची ऑफर दिली होती. त्याचबरोबर त्याच्या या तडकाफडकी निर्णयाने क्रीडा रसिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

भरपावसात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन

‘तारूण्य’ टिकवण्यासाठी हसत रहा, जाणून घ्या महत्वाचे फायदे

बाळासाहेब आंबेडकर यांची मुंबईत आज पत्रकार परिषद ,विधानसभेबाबत करणार मोठा खुलासा

ताण-तणाव दूर करून आनंदी जीवन जगा, ५ सोप्या पद्धती

पोलिसाच्या घरातच चोरट्यांनी केला हात साफ

विविध रंगाच्या बाटल्यांमधील पाणी प्या, आरोग्य सुधारेल

सर्दीची ‘अ‍ॅलर्जी’ का होते ? जाणून घ्या यामागील कारणे