रायडूसह भारताला आयसीसीचा झटका ; रायडू गोलंदाजीपासून निलंबित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – न्यूझीलंड मध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड वन डे मालिकेतील भारतीय संघाचा गोलंदाज अंबाती रायडू ला आयसीसीने जोरदार झटका दिला आहे. हा झटका फक्त अंबातीसाठी नसून संपूर्ण भारतीय संघासाठी आहे. रायडूच्या गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेत त्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्यापासून निलंबित केलं आहे.

आयसीसीच्या नियमांनुसार, कोणत्याही गोलंदाजाची शैली संशयित आढळल्यास, त्याला १४ दिवसांच्या आत आपल्या बोलिंग अॅक्शनची म्हणजेच गोलंदाजी शैलीची चाचणी द्यावी लागते. ती न दिल्यास त्या खेळाडूला निलंबीत केले जाते. या नियमानुसार रायडूची गोलंदाजी शैली अयोग्य असल्याने त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यास मज्जाव केला आहे. रायडूची गोलंदाजी शैली संशयित आढळली होती.

त्यामुळे त्याने १४ दिवसांमध्ये गोलंदाजी शैलीची चाचणी देणं आवश्यक होतं. मात्र रायडूने ती चाचणी न दिल्याने, त्याला निलंबित केलं आहे. जोपर्यंत रायडू चाचणी देऊन त्यामध्ये पास होत नाही, तोपर्यंत हे निलंबन कायम राहील. दरम्यान, आयसीसीने निर्णय जाहीर केला त्याच वेळी रायडू न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात फलंदाजी करत होता. त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवर 13 जानेवारीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे सामन्यात आक्षेप घेण्यात आला होता. आतापर्यंत रायडूच्या नावावर वन डे इंटरनॅशनलमध्ये फक्त 3 विकेट्स आहेत.