Ambedkar Jayanti | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती : चैत्यभूमीवरील सुविधांमध्ये कमतरता राहणार नाही याची दक्षता घ्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ambedkar Jayanti | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त (Ambedkar Jayanti) चैत्यभूमी (Chaitya Bhoomi) येथील सुविधांमध्ये कमतरता राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज येथे दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त (Ambedkar Jayanti) मुंबई महापालिकेमार्फत Brihanmumbai Municipal Corporation (BMC) चैत्यभूमी येथे पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha), मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव (IAS Manu Kumar Srivastava), मुंबई महापालिका आयुक्त आय एस चहल (IAS Iqbal Singh Chahal), समाजकल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे (IAS Sumant Bhange), मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर (Mumbai CP Vivek Phansalkar), समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे (Dr.Prashant Narnaware IAS ), डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, उपाध्यक्ष महेंद्र साळवे आदी उपस्थित होते.

बाबासाहेबांच्या जयंतीदिनी लाखो अनुयायी दादर येथील चैत्यभूमीवर येतात. यंदा बाबासाहेबांची १३२ वी जयंती असून त्यासाठी येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होणार नाही यासाठी महापालिका, पोलिस यांनी विशेष खबरदारी घ्यावी. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात ही जयंती होत असून त्याला वेगळे महत्त्व असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

समन्वय समितीमार्फत ज्या सूचना आणि मागणी करण्यात आली आहे त्याबाबत काटेकोरपणे अंमलबजावणी करावी,
असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री श्री.
लोढा यांच्या हस्ते जयंती दिनाच्या शुभेच्छा देणाऱ्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.मुंबई महापालिकेमार्फत जयंती दिनी करण्यात येणाऱ्या विविध सोयीसुविधांबाबत यावेळी सादरीकरण करण्यात आले.

Web Title :- Ambedkar Jayanti | Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar’s
132nd birth anniversary: ​​Care should be taken that there is no shortage of
facilities at Chaityabhoomi – Chief Minister Eknath Shinde

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस धमकी प्रकरणातील आरोपी अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर

Congress Leader Rahul Gandhi | लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर राहुल गांधींना
दुसरा धक्का! ‘सरकारी निवारा’ही जाणार

Cricketer Kedar Jadhav’s Father Missing | क्रिकेटर केदार जाधवचे वडिल पुण्यातून बेपत्ता,
पुण्याच्या अलंकार पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार

Mahindra e-Alfa | 50000 वी इलेक्ट्रिक महिंद्रा ई-अल्फा हरिद्वार येथील कारखान्यातून बाहेर पडली

MLA Sanjay Shirsat | संजय राऊतांच्या ‘त्या’ टीकेला प्रत्युत्तर देताना संजय शिरसाट यांची जीभ
घसरली, म्हणाले…