पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Ambegaon Pune Crime News | शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवून कुटुंबियांचा विश्वास संपादन करुन १९ लाख ९९ हजार २५५ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Cheating Fraud Case)
३१ वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police) फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनिल नामदेव गडकर Sunil Namdev Gadkar व किरण सुनिल गडकर Kiran Sunil Gadkar (रा. आंबेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जुलै २०२३ ते आजपर्यंत घडला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांना सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांचा विश्वास संपादन केला. वेळोवेळी फिर्यादीची पत्नी व मेव्हणा यांच्या खात्यावरुन ऑनलाईन एकूण १९ लाख ९९ हजार २५५ रुपये घेऊन कोणतीही नोकरी न लावता फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक भावड तपास करीत आहेत.