पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Ambegaon Pune Crime News | ती त्याच्यापेक्षा ९ वर्षाने मोठी, टॅटू काढण्यासाठी गेल्यावर या १५ वर्षाच्या मुलाची तिच्याशी ओळख झाली. ओळखीतून त्यांची मैत्री वाढत गेली. मजा मारण्यासाठी तिने त्याला घरातून पैसे घेऊन येण्यास सांगितले. पैसे नसल्याने मुलाने आजीची १ लाख ४० हजार रुपयांची सोन्याची मोहनमाळ चोरुन या तरुणीला दिली. तिने दुसर्या तरुणाच्या मदतीने ही मोहनमाळ विकली. त्याचे पैसे दोघांनी घेतले. याची माहिती मिळाल्यावर वडिलांनी पोलिसांकडे धाव घेतली. (Theft In Own Home)
याबाबत आंबेगाव येथील एका ५४ वर्षाच्या नागरिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी त्यांचाच १५ वर्षाचा मुलगा व एका २४ वर्षाच्या तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ११ जानेवारी रोजी साडेसहा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणीची व फिर्यादीच्या १५ वर्षाच्या मुलाची मैत्री झाली. या तरुणीच्या सांगण्यावरुन मुलाने घरातील कपाटातील फिर्यादीच्या आईची १ लाख ४० हजार रुपयांची साडेतीन तोळ्याची सोन्याची मोहनमाळ चोरली. या तरुणीला आणून दिली. तिने या मुलाची आई आजारी आहे, असे सांगून दुसर्या तरुणाकरवी ही मोहनमाळ विकली. त्याचे पैसे ही तरुणी व फिर्यादीचा मुलगा यांनी घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक समीर कदम (API Sameer Kadam) तपास करीत आहेत.