आंबेनळी अपघात : बचावलेल्या प्रकाश सावंत यांची अखेर बदली

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईन

आंबेनळी घाटात बस दुर्घटनेप्रकरणी एकमेव बचावलेले प्रकाश सावंत यांच्यावरून दापोलीत संशयाच वातावरण आहे. त्यामुळे लोकांच्या भावना लक्षात घेऊन अपघातातून वाचलेले प्रकाश सावंत यांची बदली करण्यात आली आहे. विद्यापीठ प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. दापोली कृषी विद्यापीठातून त्यांची रत्नागिरी येथील मत्स्य महाविद्यालयात बदली करण्यात आली आहे.

२८ जुलैच्या सकाळी साडेदहाच्या सुमारास आंबेनळी घाटात दापोली कृषी विद्यापीठाच्या बसला अपघात झाला आणि बसमधील ३३ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेला एक महिन्यापेक्षा अधिक काळ उलटून गेला आहे . हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेत प्रकाश सावंत नावाचे एक कृषी अधिकारी आश्चर्यकारकरित्या वाचले आणि या घटनेची माहिती सर्वांना कळवली. मात्र या दुर्घेटनेतून बचावलेल्या प्रकाश सावंतावर अनेक आरोप झाले.

[amazon_link asins=’B0756Z53JN,B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3aad80e1-b800-11e8-b8c4-071cff75e6a1′]

स्थानिक लोकांपासून ते मृतांच्या नातेवाईकांपर्यंत सगळ्यांनीच त्यांच्यावर आरोप केले. प्रकाश सावंत यांनी वेगवेगळी विधानं केल्यामुळे संभ्रम निर्माण झाला हे पोलीस तपासातूनही पुढे आलं. ३० ऑगस्टला प्रकाश सावंत यांच्या विरोधात मृतांच्या नातेवाईकांनी मोर्चाही काढला. दापोली कृषी विद्यापीठाने आपला चौकशी अहवाल यानंतर सादर केला. मात्र या अहवालात प्रकाश सावंत यांना क्लिन चिट देण्यात आली. मात्र लोक भावना लक्षात घेऊ आता प्रकाश सावंत देसाई यांची बदली करण्यात आली आहे.

गोव्यात नेतृत्वबदलाच्या हालचालींना वेग