तुमच्या-आमच्या घरातील ‘हे’ पेय होणार आता सुपर ब्रॅण्ड

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – तुम्हाला हे माहीत आहे का, अंबिलामुळे डिप्रेशनची पातळी कमी होते. होय हे खरं आहे. महाराष्ट्रात खंडोबा, ज्योतिबा अशा लोकदेवतांच्या यात्रा काळात आणि वेळा अमावस्येला जेवणात अंबिल या पदार्थाचा समावेश असतो. काही ठिकाणी अंबिल घुगऱ्यांचं जेवणंही दिलं जात. अंबिल हे ताकापासून बनवलं जातं. अंबिलाच्या सेवनाने डिप्रेशनची पातळी कमी होते. कारण यामुळे स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात सं संशोधन बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड विद्यापीठानं केलं आहे अशी माहिती समोर आली आहे.
आता ही माहिती समोर आल्यानंतर अनेकांच्या ताटात अंबिल नावाचा पदार्थ हमखास दिसणार आहे. जरी तुम्हाला अंबिल बनवता येत नसेल तरी काळजी करू नका. कारण आंबिल आरोग्यासाठी लाभदायक असल्याचं संशोधनात समोर आल्यानंतर अमुल आणि सयाजीराव गायकवाड विद्यापीठानं एकत्रितरित्या विक्री सुरु करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे तुम्हाला अंबिल हवं तेव्हा अगदी सहज उपलब्ध होईल. इतकेच नाही तर अंबिल कसे बनवले जाते ? त्याला काय साहित्य लागते ? याचीही माहिती आपण घेणार आहोत.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, सयाजीराव गायकवाड विद्यापीठातील फुडस आणि न्युट्रिशन विभागानं तीन वर्षे 290 लोकांवर अंबिल आणि ताणतणाव याबाबत एक संशोधन केलं आहे. या संशोधनातून असे समोर आले की, आंबिलमुळे 30 दिवसात कोट्रीसॉल नावाच्या घटकात  4.2 टक्क्यांनी घट झाली. त्यामुळे डिप्रेशनची तणावाची पातळी वेगाने कमी झाल्याचे पाहायला मिळाले.  कोट्रीसॉल नावाचा घटक स्ट्रेस हार्मोन म्हणून ओळखला जातो. त्यामुळे ज्या लोकांना ताणतणाव किंवा डिप्रेशनची समस्या आहे त्यांनी अंबिलाचे सेवन करायला हरकत नाही.
अंबिल या पदार्थालाच ‘शेतकऱ्यांचं सूप’ही म्हणतात. आता बडोदा विद्यापीठाबरोबर मिळून अमुलनं तयार अंबिल अधिक काळ टिकेल असं तंत्र विकसित केलं आहे. अमुलद्वारे अंबिलाची छोटी छोटी पाकीटं बनवून विकण्यात येणार आहेत. फक्त महाराष्ट्रातच नाही तर अंबिल हे पेय गुजरात, कर्नाटक, राजस्थान आणि उत्तर प्रेदशात ‘रबडी छास’ म्हणून प्रसिद्ध आहे.
आंबिल कसं बनवायचं?
साहित्य – दोन चमचे नाचणी किंवा ज्वारीचे पीठ, पाव कप आंबट ताक, तीन कप पाणी, चवीप्रमाणे मीठ, दोन चमचे बारीक कापलेला कांदा, एक लहान पाकळी लसुन
कृती – आंबट ताकात नाचणीचे किंवा ज्वारीचे पीठ रात्रभर भिजवावे. सकाळी उठून 3 कप पाणी गरम करायला ठेवावे. त्यात साधारण आवश्यकतेनुसार मीठ घालावे. साधारण उकळीला येईल असे वाटले की गॅस बारीक करून ताकात भिजवलेली नाचणी त्यात घालावी. गुठळ्या होऊ न देता ती नीट मिसळून चमच्याने ते मिश्रण हलवत राहावे. उतू जाण्याची शक्यता असल्याने गॅस मोठा करू नये. एक उकळी आली की गॅस बंद करुन आंबिल थंड करायला ठेवावे. प्यायला देताना त्यात आवडीप्रमाणे कच्चा कांदा, बारीक केलेला लसून आणि आंबट ताक घालून द्यावे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us