सुशांतचा मृतदेह नेणार्‍या रुग्णवाहिका चालकाला धमकीचे फोन

पोलिसनामा ऑनलाईन – अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह घेऊन जाणारा रुग्णवाहिका चालक चर्चेत आला आहे. सुशांतचे चाहते त्याला धमकीचे फोन करत असल्याचे विशाल बंदगार यांनी सांगितले आहे .

सुशांतने आत्महत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला होता. ही रुग्णवाहिका विशाल बंदगार चालवत होते. रुग्णवाहिकेमध्येच सुशांतचा गळा आवळून त्याचा खून केल्याचे काही चाहत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्या हे काही चाहते विशाल बंदगारला सतत फोन करुन धमकी देत आहेत. दिवसातून असे धमकीचे अनेक फोन येत असून ते अर्वाच्च भाषेत बोलत असल्याचे त्यांनी आहे. मी आणि माझा भाऊ शहरातील अनेक रुग्णालयात रुग्णवाहिका चालक म्हणून काम करतो. परंतु, मी सुशांतचा मृतदेह रुग्णवाहिकेतून घेऊन गेलो तेव्हापासून आज एक महिना झाला, मला सतत धमकीचे फोन येत आहेत. रुग्णालयात नेतांना सुशांत जीवंत होता, मात्र रुग्णवाहिकेत त्याचा गळा आवळा गेला त्यामुळे तुम्हाला त्याची शिक्षा मिळेल असेही चाहते म्हणत असल्याचे विशालने सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like