पोलिसांच्या मारहाणीत रुग्णवाहिका चालकाचा मृत्यू झाल्याचा मुलाचा आरोप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेच्या चालकाला पोलिसांनी मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या मुलाने केला आहे. तळेगाव टोलनाक्यावर हा प्रकार शुक्रवारी घडला असून, बोरीवलीवरून नगरला रुग्ण घेऊन जात होते. पोलिसांनी गुन्हा दाखल न करण्यासाठी 3 हजार रुपये घेतल्याचा आरोप देखील केला आहे.

नरेश शिंदे (वय 55, ठाणे) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नरेश शिंदे हे मूळचे बोरवली येथील आहेत. ते येथील एका रुग्णवाहिकेवर चालक म्हणून काम करतात.दरम्यान एका रुग्णाला घेऊन ते ठाण्यावरून नगरच्या दिशेने जात होते. गाडीत 6 ते 7 जण होते. दरम्यान तळेगाव टोलनाक्याजवळ आल्यानंतर तेथे बंदोबस्तवरील पोलिसांनी रुग्णवाहिक अडविली व चौकशी सुरू केली.

यावेळी गाडीत माणसे जास्त असल्याचे पाहून पोलिसांनी वाहतूक करत आहात. रुग्ण नाही असे म्हणून दाब दिला. त्यावेळी चालक नरेश यांनी रुग्ण असून त्याला ताप आहे. आम्हाला रुग्ण असल्यास घेऊन जावे लागते असे सांगितले. पण पोलीस ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. यावेळी पाठीमागून आलेल्या एका कर्मचाऱ्याने त्यांच्या शीटवर जोरात काठी मारली. यात नरेश हे जागीच खाली बसले. त्यांना घाम आला. त्यांनी पोलिसांकडे खूप विनवणी केली. त्यानंतर दाब देत त्यांना वरिष्ठाकडे नेले. त्यांनीही खोट बोलत आहात, असे म्हणून दाब दिला. त्यानंतर त्यांना फाईन भरा किंवा गुन्हा दाखल करू असे सांगितले. मात्र, नरेश यांनी पैसे नाही देऊ शकत, आम्ही असे खोट काही करणार नाही असे सांगितले. तरीही पोलिसांनी आमच्याकडून 3 हजार रुपये घेतले. त्यानंतर आम्हाला सोडून दिले, असे नरेश यांचा मुलगा निलेश शिंदे यांनी बोलताना सांगितले.

रुग्णवाहिका घेऊन जात असताना चाकणजवळ अचानक नरेश यांना त्रास झाला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांनतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. यावेळी स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तसेच मृतदेह ससून रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. पोलिसांनी केलेल्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाला असल्याचे मुलगा निलेश यांनी सांगितले.

दरम्यान पोलीस संचारबंदीचा फायदा घेऊन लूट करत असल्याचा आरोप करण्यात येत आहेत. तर पोलीस अश्या काळात देखील नाहक त्रास देत असल्याने मदत कोणाकडे मागायची असा प्रश्न उपस्थित झाला आहे.