अ‍ॅम्बुलन्स चालकानं 6 KM अंतरासाठी ‘कोरोना’ रूग्णाकडे मागितले 9200 रूपये, नकार दिल्यानंतर काढला ‘ऑक्सिजन’चा ‘सपोर्ट’ !

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामधून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे अ‍ॅम्ब्युलन्स चालकास मनमानी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर कोरोनाच्या एका रुग्णाला वाहनातून बाहेर उतरण्यास भाग पाडले गेले. राजधानीत एका रुग्णवाहिका चालकाने कोविड – 19 ग्रस्त दोन मुले आणि त्यांच्या आईला गाडीतून उतरण्यास भाग पाडले, कारण ते शहरातील दोन रुग्णालयांदरम्यान सहा किलोमीटर अंतरासाठी मागितलेले अवाजवी पैसे देऊ शकले नाही. मात्र, डॉक्टरांच्या हस्तक्षेपानंतर ड्रायव्हरने 2 हजार घेतले, असे मुलांच्या वडिलांनी सांगितले.

दोन भाऊ , ज्यात एक नऊ महिन्यांचा आणि दुसरा साडे नऊ वर्षांचा आहे. दोघांचा इन्स्टिट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ (आयसीएच) मध्ये उपचार सुरू होता आणि शुक्रवारी कोविड – 19 असल्याची खात्री पटली, त्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना सरकरी रूग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलविण्याचा प्रयत्न केला. मुलांच्या वडिलांचा आरोप आहे की, ड्रायव्हरने पार्क सर्कस येथील आयसीएचपासून कॉलेज स्ट्रीट परिसरातील कोलकाता मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी 9,200 मागितले.

हुगळी जिल्ह्यात राहणाऱ्या या व्यक्तीने सांगितले की, रुग्णवाहिकेचा चालकाने माझ्या मुलांना या रुग्णालयापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या केएमसीएच येथे नेण्यासाठी 9,200 रुपये मागितले. मी त्याला सांगितले की मी इतके पैसा देणार नाही आणि मी त्याला विनवणी करत राहिलो पण त्याने ऐकले नाही. त्याउलट, ड्रायव्हरने माझ्या लहान मुलाचा ऑक्सिजनचा आधार काढून मुलांना आणि त्यांच्या आईस जबरदस्तीने बाहेर उतरण्यास भाग पाडले. व्यक्तीने सांगितले की, मी आयसीएचच्या डॉक्टरांचे आभारी आहे. त्यांच्यामुळे माझ्या मुलांना चांगल्या उपचारासाठी केएमसीएचमध्ये पोहोचण्यात यश आले.