अभिनेत्री अमिषा पटेल हिच्याविरुद्ध अटक वारंट जारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलीवुड अभिनेत्री अमीषा पटेल हिच्याविरुद्ध रांची मधील न्यायालयाने अटक वारंट काढले आहे. निर्माता अजय कुमार यांनी अडीच कोटी रुपयांचा चेक बाउंस झाल्याप्रकरणी तिच्यावर आरोप केला होता. मागील वर्षी ‘देशी मॅजिक’ हा सिनेमा बनवण्यासाठी अजय यांनी आमिष पटेल हिला तीन कोटी रुपये उधार दिले होते. त्यानंतर तिच्याकडे पैश्यांची मागणी केली असता ती त्यांना टाळू लागली. त्यानंतर तो सिनेमा गुंडाळला गेल्यानंतर अजय कुमार यांनी पुन्हा आपले पैसे परत मागितले. त्यानंतर तिने त्यांना अडीच कोटी रुपयांचा चेक दिला. मात्र तो बाउंस झाला. त्यासंदर्भातच न्यायालयात खटला सुरु आहे.
FIR
याविषयी बोलताना अजय कुमार यांनी सांगितले कि, खटला दाखल केल्यानंतर अनेक वेळा तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तिच्याशी संपर्क झाला नाही. तसेच तिने देखील काहीही उत्तर दिले नाही. याआधी देखील तिच्यावर अशा प्रकारे फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तिने अनेक बड्या व्यक्तींबरोबर काढलेले फोटो दाखवून शांत राहण्याची धमकी दिली होती.

इव्हेंट ऑर्गनायजरने देखील केले आरोप
त्याआधी देखील एका इव्हेंट ऑर्गनायजरची 11 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. एका लग्नामध्ये नृत्य करण्यासाठी तिला 11 लाख रुपये देण्यात आले होते. मात्र तिने त्या ठिकाणी नृत्य न करता फसवणूक केली. त्यामुळे यावेळी तिच्यावर मोठ्या रकमेचा आरोप केला असल्याने हा आरोप गांभीर्याने घेण्यात आला आहे.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like