न्यूयॉर्कमध्ये गोळीबाराच्या 13घटनांमध्ये 19 जखमी, पिडीतांचे वय 16 ते 47 वर्षांदरम्यान

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – न्यूयॉर्क शहात गोळीबाराच्या 13 वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये सुमारे 19 लोक जखमी झाले आहेत. न्यूयॉर्क सिटी पोलीस खात्याने सांगितले की, ते अर्ध्या रात्रीनंतर झालेल्या 13 वेगवेगळ्या गोळीबाराच्या घटनांचा तपास करत आहेत. या घटनांमध्ये ब्रोंक्समधील 6, क्विंसमधील 2, ब्रुकलिनमधील 4 आणि मॅनहटनमधील एका घटनेचा समावेश आहे. जखमींपैकी एकाची स्थिती गंभीर आहे. पीडितांचे वय 16 ते 47 वर्षांच्या दरम्यानचे आहे. सिन्हुआ वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, न्यूयॉर्क सिटी पोलीस खात्याने म्हणजे एनवायपीडीने आपले अंडरकव्हर अँटी-क्राइम युनिट बंद केल्यानंतर पहिल्याच आठवड्याच्या शेवटी या घटना घडल्या आहेत.

एनवायपीडीचे कमिश्नर डर्मोट शिया यांनी 15 जून रोजी म्हटले होते की, शेजारच्या पोलिसिंग आणि हेरगिरीच्या कामासह अन्य 600 कामांसाठी अँटी-क्राइम अधिकार्‍यांना विभाग ताबडतोब कामाला लावेल. विभागाने मे महिन्यात झालेल्या शहरातील गुन्ह्यांच्या आकड्यांबाबत सांगितले होते. यामध्ये 100 गोळीबाराच्या घटना झाल्या ज्या मागच्या वर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत 64 टक्के अधिक आहेत. तर दुसरीकडे ब्रिटनची राजधानी लंडनपासून 65 किमी दूर असलेल्या रीडिंग शहराच्या एका पार्कमध्ये चाकूबाजीच्या घटनेत तीन लोकांचा मृत्यू झाला तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी हल्ल्यातील आरोपी 29 वर्षीय एका लिबियन नागरिकाला अटक केली आहे.

सुरूवातीस स्थानीय टेम्स व्हॅली पोलिसांनी या हत्याकांडाचा तपास सुरू केला होता, परंतु रविवारी सकाळी त्यांनी एक वक्तव्यात म्हटले की, या हल्ल्याला दहशतवादी घटना समजण्यात आले आहे. आता याचा तपास दहशतवादी विरोधी पोलीस टीमकडे हस्तांतरीत केला आहे. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, हल्ला त्यावेळी सुरू झाला, जेव्हा एक माणूस सुमारे 8 ते 10 मित्रांच्या गटाकडे वळला आणि त्यांना चाकूने मारण्यास सुरूवात केली. या दरम्यान जेव्हा गोंधळ उडाला आणि लोक घटनास्थळावरून पळून जाऊ लागले तेव्हा हल्लेखोर सुद्धा पार्कमधून पळाला. पोलिसांनी म्हटले की, सध्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही. परंतु नागरिकांनी सावध राहावे आणि कोणतीही संशयास्पद घटना दिसल्यास ताबडतोब पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे.