सर्व्हे : अमेरिकेतील भारतीय समुदायाचे तब्बल ‘एवढे’ टक्के लोक डोनाल्ड ट्रम्प यांना देवु शकतात मतदान, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हाईट हाऊसने म्हटले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतीय जनतेचे आणि भारतीय वंशाच्या अमेरिकन लोकांच्या व्यापक समर्थनाबद्दल त्यांचे खूप आभारी आहोत. व्हाईट हाऊसने त्या सर्वेक्षणाच्या उत्तरात ही टिप्पणी केली आहे, ज्यात म्हटले गेले आहे कि अमेरिकेच्या काही प्रमुख राज्यांतील भारतीय समुदायातील ५० टक्के पेक्षा जास्त लोक नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांना मतदान करू शकतात. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातील निकालावरील प्रश्नाला उत्तर देताना व्हाईट हाऊसच्या उप प्रेस सचिव सारा मॅथ्यूज यांनी ही टिप्पणी केली.

सामान्यपणे डेमॉक्रॅटिक पक्षाला मतदान करणारे भारतीय वंशाचे अमेरिकन ३ नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीत ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला मतदान करू शकतात. मॅथ्यूजने सांगितले, ‘राष्ट्रपती ट्रम्प भारतीय लोक आणि अमेरिकेमध्ये राहणाऱ्या लाखो भारतीय वंशाच्या लोकांकडून मिळालेल्या व्यापक सहकार्याबद्दल त्यांचे आभारी आहेत.’

ट्रम्प यांच्या भारतीय – अमेरिकन फायनान्स समितीचे सह-अध्यक्ष अल मॅसन यांनी केलेल्या सर्वेक्षणाच्या निकालानुसार, निवडणूक स्पर्धा असेलली महत्वाची राज्ये मिशिगन, फ्लोरिडा, टेक्सास, पेंसिलवेनिया आणि व्हर्जिनियामध्ये ५० टक्क्यांहून अधिक भारतीय वंशाचे अमेरिकन ट्रम्प यांच्या बाजूने मतदान करू शकतात. अध्यक्ष म्हणून साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात ट्रम्प यांनी भारतीय-अमेरिकन समुदायापर्यंत पोहोचण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह असलेले त्यांचे जवळचे संबंध त्यांना भारतीय नागरिकांच्या ह्रदयात स्थान मिळवून देण्यास मदत करत आहेत.

मॅथ्यूजने म्हटले, ‘ट्रम्प यांनी आपली अर्थव्यवस्था वाढवण्यास, आपली संस्कृती समृद्ध करण्यासाठी आणि आपल्या समुदायाला बळकट करण्यासाठी भारतीय अमेरिकन लोकांची महत्त्वपूर्ण भूमिका ओळखली आहे.’ त्यांनी म्हटले की, भारतीय वंशाच्या अमेरिकन लोकांमधील बेरोजगारीचे प्रमाण जवळपास ३३ टक्क्यांनी कमी झाले.