Coronavirus : ‘आर्टिफिशियल इंटेलीजन्स’ सांगणार ‘कोरोना’ संक्रमित असलेल्या कोणत्या रूग्णाची ‘प्रकृती’ जास्त बनणार ‘गंभीर’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   शास्त्रज्ञांनी कृत्रिम बुद्धिमत्ताचे (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) एक टूल विकसित केले आहे जे अचूकपणे शोधून काढले की, कोरोना ग्रस्त असलेल्या व्यक्तीची प्रकृती आणखी खराब होणार आहे आणि श्वसनाच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. एका जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यास अहवालात या आजाराची वाढती चिन्हे देखील सांगितली आहेत. न्यूयॉर्क विद्यापीठातील क्लिनिकल सहाय्यक प्रोफेसर मेगन कॉफी म्हणाले की, आमच्या मॉडेलची सत्यता प्रस्थापित करण्याचे अजून काम बाकी आहे. ज्यांची स्थिती अधिक खराब होऊ शकते अशा रूग्णांना शोधण्यात हे सक्षम आहे. व्हायरस ग्रस्तांवर उपचार करण्याचा अनुभव असलेल्या डॉक्टरांसाठी हे योग्य आहे.

न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीचे आणखी एक क्लिनिकल सहाय्यक प्राध्यापक अनासे बारी म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एखादे साधन तयार करणे हे आमचे उद्दीष्ट आहे जेणेकरुन भविष्यात कोरोना ग्रस्त सापडेल. आम्हाला आशा आहे की जेव्हा हे साधन पूर्ण विकसित केले जाईल, तेव्हा त्याच्या मदतीने डॉक्टर कोणत्या रुग्णाला घरी पाठवले जाऊ शकतात आणि कोणास रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे याचे मूल्यांकन करता येईल. या अभ्यासामध्ये, चीनच्या दोन रुग्णालयांमधील सार्स कोरोना विषाणूच्या ५३ रुग्णांच्या उपचाराशी संबंधित सर्व डेटा वापरला गेला आहे. या सर्व रूग्णांमध्ये सुरुवातीची लक्षणे फारच साधारण असल्याची दिसून आली परंतु एक आठवड्यानंतर यातील काही लक्षणे वाढू लागली. काहींना न्यूमोनिया देखील झाला.

या अभ्यासाचे एक उद्देश हेही होते की, आर्टिफिशियल इंटेलिजन्सकसून हे समजले जाऊ शकते कि कोणत्या कोरोना ग्रस्ताला श्वसनप्रक्रियेत गंभीर समस्या होऊ शकते, जे जीवघेणे आहे विशेषकरून वृद्धांच्या बाबतीत. संशोधकांनी असे कॉम्प्युटर विकसित केले जे उपलब्ध डेटाच्या आधारे निर्णय देतील. यात जितका डेटा भरला जाईल तितका चांगला परिणाम देईल.

संशोधक या गोष्टीमुळे हैराण आहेत की, कोविड-१९ बाबत जो स्थापित विश्वास आणि लक्षणे आहेत ती एखादे प्रकरण बिघडण्याचे संकेत देण्यासाठी उपयोगी नाही. ताप, फुफ्फुसांचा एक्स-रे, रोगाचा नमुना, रुग्णाचे वय आणि लिंग इत्यादीने या आजाराला बिघडण्याचा अंदाज नाही लावला जाऊ शकत. या अभ्यासात ६० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लोकांना जीवघेणा असल्याचे पूर्व-स्थापित मत देखील आढळले.

या टूलमध्ये हेदेखील आढळले की, एखादा रुग्णाच्या तीन गोष्टी – किडनी एंझाइम ऍनालाइन ऍमिनोट्रान्सफीरेस (एएलटी), मायलजियाची स्थिती आणि हिमोग्लोबिनच्या स्तरामुळे अचूक समजले जाऊ शकते कि कोणाची स्थिती आणखी खराब होईल. या रिसर्च टीमने आतापर्यंत जितक्या प्रकरणात शंका व्यक्त केली आहे त्यात ८० टक्के सत्यता आढळली आहे.