नारीशक्ती : अमेरिकेनं रचला इतिहास ! हवाई दलात पहिल्यांदाच मुख्य मास्टर ‘सर्जंट’ म्हणून महिलेची निवड

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – चीफ मास्टर सर्जंट जोआन एस. बास यांची हवाई दलाच्या 19 व्या चीफ मास्टर सार्जंट म्हणून शुक्रवारी निवड करण्यात आली आहे आणि त्यासह अमेरिकेच्या कोणत्याही लष्करी सेवेतील सर्वोच ‘एन्लिस्टिड लिडर’ म्हणून निवड झालेल्या पहिला महिला ठरल्या आहेत. वायुसेनेने या महिन्यात दुसऱ्यांदा चीफ मास्टर सर्जंट म्हणून महिलेची निवड करून इतिहास रचला आहे. यापूर्वी दोन आठवड्यापूर्वी पहिल्यांदा सिनेटने जनरल चार्लस क्यू ब्राऊन यांची एअरफोर्सच्या चीफ ऑफ स्टाफ पदावर नियुक्ती केल्याची पुष्टी झाली आहे.

जोआन एस बास यांची शक्तीशाली यूएस एअर फोर्सचे मुख्य मास्टर सर्जंट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अमेरिकेच्या वायु सेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एवढेच नाही तर अमेरिकेच्या सैन्य सेनेचे नेतृत्तव करणाऱ्या एस. बास या पहिल्या आफ्रिकन अमेरिकन असणार आहेत. एस बास या ब्राऊन आणि हवाई दलाच्या सचिव बार्बरा बॅरेटचे वरिष्ठ सल्लागार म्हणून काम करतील. एस बास या 1993 मध्ये हवाई दलात नियुक्त झाल्या.

चार्ल्स क्यू ब्राऊन एअरफोर्सच्या चीफ ऑफ स्टाफ
यापूर्वी सुमारे दोन आठवड्यापूर्वी सिनेटने जनरल चार्ल्स क्यू यांची एअरफोर्सच्या चीफ ऑफ स्टाप पदावर नियुक्ती केल्याची पुष्टी झाली. अमेरिकेच्या कोणत्याही सैन्य सेवेचे नेतृत्त्व करणाऱ्या ब्राऊन या पहिल्या अश्वेत महिला बनल्या आहेत. त्या ऑग्टमध्ये पदभार स्विकारणार आहेत. अमेरिकेन सैन्यात वरिष्ठ पदावर क्वचितच महिलांना बढती दिली जाते. आत्तापर्यंत कोणत्याही महिलेला कोणत्याही लष्करी सेवेतील प्रमुख म्हणून काम करण्याची संधी दिली गेली नाही, किंवा कोणत्याही महिलेने जॉइंट चीफ ऑफ स्टाफच्या सदस्य म्हणून काम केले नाही.