भारत नव्हे तर अमेरिकेचीच हवा घाणेरडी ! डोनाल्ड ट्रम्प यांना तोंडावर पाडणारा ‘हा’ रिपोर्ट

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – सध्या अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचं (United States Presidential election, 2020) जोरदार वारं वाहताना दिसत आहे. प्रचारानंही जोर धरला आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि जो बायडन (Joe Biden) यांच्यात सामना रंगताना दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत (India), चीन (China) आणि रशिया (Russia) या देशांमधील हवा अशुद्ध असल्याचं एका सार्वजनिक चर्चेत म्हटलं होतं. त्यानंतर आता अमेरिकेतील वातावरण आणि पर्यावरणावर देखील प्रश्न उपस्थित केले जाताना दिसत आहेत.

एका चर्चेत डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत कार्बनचं उत्सर्जन कमी होत असल्याचं म्हटलं होतं. मात्र आकडेवारीनुसार अमेरिकेतील हवेची खरी परिस्थिती काय आहे ते आता समोर आलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण विभागानं 2019 मध्ये एमिशन गॅप रिपोर्ट (Emissions Gap Report) प्रकाशित केला होता. त्यानुसार याआधी आणि आताही अमेरिकेत सर्वात जास्त ग्रीन हाऊसचं उत्सर्जन होत आहे. ग्रीन हाऊस गॅसच्या (Greenhouse gas) दरडोई उत्सर्जनाचा विचार केला तर अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे आणि एकूण उत्सर्जनाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. क्लायमॅट ॲक्शन ट्रॅकरनुसार कोरोनाच्या या संकटात अमेरिकेत विषारी वायुंचं उत्सर्जन हे 10 टक्क्यांनी कमी होणार आहे.

ट्रम्प यांच्याकडे कोणत्याही प्रश्नावर योग्य नीती नाही असंच या चर्चेत दिसलं. ट्रम्प प्रशासनाकडं ग्रीन गॅसचं उत्सर्जन कमी करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना नाही. डाऊन टू अर्थच्या रिपोर्टनुसार, कोरोनाच्या काळात तापमान कमी होणार आहे. त्यामुळं या काळात कमी झालेलं तापमान हे पर्यावरण नीतींमुळं कमी झाल्याचं सांगत ट्रम्प प्रशासन यांचं श्रेय घेईल असंही या रिपोर्टमध्ये नमूद केलं आहे.

या रिपोर्टनुसार, ट्रम्प सरकार निवडणुकीनंतर पॅरीस करारातून बाहेर पडण्याची तयारी करत आहे. त्यामुळं इराण आणि तुर्की प्रमाणेच अमेरिका देखील या करारातून बाहेर पडेल त्याचसोबत शुद्ध हवा, वन्यजीव आणि विषारी केमिकल या बाबतीतही ट्रम्प प्रशासन अयशस्वी ठरलं आहे. न्यूयॉर्क टाईम्सच्या विश्लेषणात असं सांगण्यात आलं आहे की, पर्यावरणासंबंधी 72 नियम एकतर ट्रम्प सरकरानं रद्द करावेत किंवा त्यांच्यात बदल तरी करावा. याशिवाय इतर 27 नियमांनाही हटवण्याची तयारी सुरू आहे. उदाहरण म्हणजे पॉवर प्लांटमधून आणि गाड्यांमधून निघणाऱ्या कार्बन डायॉक्साईडच्या प्रमाणाची मर्यादा कमी करण्यात आली आहे. सुपीक जमिनी नासवल्या आहेत.

अमेरिकेचे राज्य सचिव माईक पॉम्पिओ (Mike Pompeo) आणि सुरक्षा सचिव मार्क एस्पर (Mark Esper) नवी दिल्लीत येणार आहेत. या भेटीदरम्यान अमेरिका आणि भारतात सहकार्य करार मजबूत करण्यावर चर्चा होणार असल्याचं समजत आहे. परंतु त्याआधी आलेले ट्रम्प यांचं वक्तव्य चर्चेचा विषय ठरला आहे.

एनव्हायर्नमेंट प्रोटेक्शन एजन्सीनं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, अफोर्डेबल क्लीन एनर्जीमुळं (Affordable and Clean Energy – ACE) 2030 पर्यंत 1630 अतिरीक्त प्रीमॅच्युअर मृत्यू होऊ शकतात. सोबतच 120000 अस्थमा अटॅक येऊ शकतात. 140000 दिवस शाळेचे दिवस बुडू शकतात. 48000 वर्किंग डे (Working Days) बुडू शकतात. माजी अध्यक्ष ओबामांच्या (Barack Obama) काळात असलेला क्लीन पॉवर प्लॅन बरोबर होता. तो बदलून ट्रम्प सरकारनं ACE लागू केल्यानं त्यांच्यावर याआधीही टीका झाली आहे.