अमेरिकेची चीनसोबत ‘शीत’ युद्धाची घोषणा, ‘व्हिजन डॉक्युमेंट’ जाहीर करून केले ‘आरोप’

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापारावरून सुरु झालेले भांडण आता शीत युद्धावर येऊन पोहचले आहे. चीनबद्दल आपल्या नवीन व्हिजन डॉक्युमेंटमध्ये (व्हिजन पेपर), नियम व कायद्यांच्या आधारे जागतिक व्यवस्थेचा दुरुपयोग करून त्याला चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या (सीसीपी) विचारधारा आणि हितसंबंधांशी सुसंगत बनवण्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. त्याचबरोबर, हितसंबंधाच्या संघर्षात जी आव्हाने मिळत आहत त्यांना थेट उत्तर देण्याची घोषणा केली आहे.

जाहीर केले व्हिजन डॉक्युमेंट
व्हाइट हाऊसने युनायटेड स्टेट्स स्ट्रॅजिक अप्रोच टू पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना या नावाचा युनायटेड स्टेट्स व्हिजन डॉक्युमेंट जाहीर केले आहे. यामध्ये शीत युद्ध हा शब्द वापरला गेला नसला तीर त्याचा हेतू स्पष्ट आहे. अमेरिकेने हे मान्य केले आहे की, त्यांचे हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी दोन मोठ्या शक्ती समोरासमोर आहेत. सीसीपीकडून मिळत असलेल्या थेट आव्हानांना उत्तर देण्याची अमेरिकेने घोषणा केली आहे.

जबाबदार राष्ट्रासारखे वागेल
रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना बद्दल अमेरिकेचे धोरण आतापर्यंत या अपेक्षेवर आधारीत होते की, त्यांच्या सोबतचे संबंध मजबूत केल्यास तेथील मूलभूत अर्थव्यवस्था व राजकीय खुलेपणाला चालना मिळे आणि जागतिक क्रमवारीत चीन एक जबाबदार राष्ट्रासारखे वागेल.
अमेरिकेला चीनची चाल समजली नाही.

40 वर्षानंतर हे सिद्ध झाले आहे की, अमेरिकेला चीनच्या आर्थिक आणि राजकीय सुधारणा संपवण्याची चाल समजली नाही. गेल्या दोन दशकांत तेथील सुधारणा संथ, विस्कळीत किंवा उलट आहे. पीआरसीची वेगवान आर्थिक वाढ आणि जगातील इतर देशांसोबतचे संबंध नागरिक केंद्रित राहिलेले नाहीत. त्याऐवजी, सीपीपने आपल्या पद्धतीने आणि विचारधारेनुसार आंतरराष्ट्रीय प्रणाली बनविण्यासाठी खुल्या व नियमांवर आधारित व्यवस्थेचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला आहे.

कोरोना चीनहून आला, ट्रम्प यांचा आरोप
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांनी पुन्हा एकदा सांगितले की, कोरोना विषाणूची उत्पत्ती चीनपासून झाली आहे आणि त्यांचा देश त्यास हलक्यात घेणार नाही. मिशिगनमध्ये आफ्रिकन-अमेरिकन नेत्यांसमवेत झालेल्या बैठकीत उपस्थित राहून ट्रम्प म्हणाले, कोरोना हा चीनमधून आला आहे. आम्ही त्याबद्दल खूष नाही. आम्ही व्यापार करारावर स्वक्षरी केली होती. त्याची शाई अद्याप वाळलेली नाही तोच अचानक हे संकट आलं. आम्ही याला हलक्यात घेणाऱ्यांपैकी नाही. चीन ट्रम्प यांच्याबाबत अत्यंत कठोर वक्तव्य करत आहे. मात्र अद्याप त्यांनी यावर कोणती भूमिका घेणार हे स्पष्ट केले नाही.

अमेरिका औषध-वैद्यकीय उपकरणाच्या उत्पादनात अग्रेसर राहील
ट्रम्प म्हणाले की, अमेरिका फार्मास्युटिकल आणि मेडिकल उपकरणांच्या निर्मितीमध्ये अग्रेसर राहील. जागतिक महामारीने पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे की अमेरिकेला एक सशक्त राष्ट्र होण्यासाठी उत्पादक देश बनले पाहिजे. अमेरिकेला उत्पादन देश बनविणे हे आपले लक्ष्य आहे. अमेरिका फार्मास्युटिकल व वैद्यकीय उपकरणे निर्मिती क्षेत्रात जगातील आघाडीचा देश बनले. आम्ही आमच्या औषध कंपन्या परत आणत असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.

You might also like