भारत आणि चीनच्या सीमा वादावर अमेरिका ‘मध्यस्थी’ करण्यास तयार : डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारत आणि चीनच्या सैन्यांच्या सीमेवर वाढणाऱ्या दबावा दरम्यान अमेरिकेनेही उडी घेतली आहे. आता लडाख प्रदेशात दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांपासून काही मीटर अंतरावर तैनात आहेत आणि दोन्ही बाजूंकडून सैन्यांची संख्याही वाढवण्यात येत आहे, त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्याची तयारी दाखवली आहे. दरम्यान, बुधवारी चीनने सीमेवरील स्थिती बदलण्याचे संकेत दिले आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताच्या सीमेवरील तणाव स्थिर आणि नियंत्रणात असल्याचे सांगितले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांनी बुधवारी सांयंकाळी पाच वाजता ट्विट करत सांगितले की आम्ही भारत आणि चीन त्यांच्यातील सीमावाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्यास तयार आहोत. भारत आणि चीनमधील सीमा वादावर अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाने प्रथमच भाष्य केले आहे. अमेरिकन राष्ट्राध्याक्षांनी यामध्ये मध्यस्थी करण्यास तयारी दर्शवल्याने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येते.

सीमेवरील तणाव आणि गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हे ट्विट केले असावे. लडाख प्रदेशात चीनच्या सैन्याने भारतीय सीमेत प्रवेश करून तंबू उभारल्याचे पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी एनएसए अजित डोभाल, संरक्षणमंत्री राजननाथ सिंह, सीडीएस बिपीन रावत आणि तिन्ही सैन्य दालांच्या प्रमुखांची भेट घेतली. आंतरराष्ट्रीय मीडियाने देखील या बैठकीला महत्त्व दिले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या या विधानाच्या आधी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने चीनकडून भारतीय हद्दीत प्रवेश केल्याने चिंता व्यक्त केली आहे. यापूर्वी डोकलाम वादाच्या वेळी (जुलै-सप्टेंबर 2017) अमेरिकेने भारताची बाजू घेतली होती.

दुसरीकडे बुधवारी, जेव्हा परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याला भारतीय सीमेवरील तणाबाद्दल विचारले गेले, तेव्हा त्यांनी सांगितले की, परिस्थिती स्थिर आहे आणि नियंत्रणात आहे. दोन्ही देशांकडून हा प्रश्न सोडवण्यासाठी लष्करी आणि मुत्सद्दी पातळीवर चर्चा सुरु आहे. प्रवक्ता झाओ लिजियान यांनी म्हटले की, चीन आपल्या भौगोलिक सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यास पूर्णपणे सक्षम आहे. जोपर्यंत भारताच्या सीमेचा प्रश्न आहे तोपर्यंत परिस्थिती स्थिर आणि नियंत्रणात आहे. जर समस्या असलेत आम्ही चर्चेस तयार आहोत.
विशेष म्हणजे मे 2020 च्या पहिल्या आठवड्यात चिनी सैन्यांनी भारताच्या जवळ असलेल्या सीमा भागात तीन ठिकाणी भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचे पाच हजार सैनिक पूर्व लडाखच्या भागात भारतीय हद्दीत कॅम्प बनवत आहेत. हे आव्हान लक्षात घेता भारताने त्या ठिकाणी आणखी सैन्य तैनात करण्यास सुरुवात केली आहे. भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे हे देखील लडाख येथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेले होते.