चिंताजनक ! ‘वॅक्सीन’नं देखील अमेरिकेतील ‘कोरोना’ होणार नाही नष्ट, एक्सपर्ट असं का म्हणाले ? , जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेचे सर्वोच्च संसर्गजन्य रोग तज्ज्ञ आणि कोरोना नियंत्रणासाठी नेमलेल्या शासकीय समितीत समाविष्ट असलेल्या डॉ. अँथनी फौची यांनी इशारा दिला आहे की, लस तयार झाल्यानंतरही अमेरिकेत कोरोना टिकण्याची शक्यता आहे. एका वृत्तसंस्थेनुसार, फौची म्हणाले की अमेरिकेत बरेच लोक असे म्हणत आहेत की ते कोरोना लस लावणार नाहीत, यामुळे अमेरिकेत हर्ड इम्युनिटी मिळण्याची शक्यता नाही.

डॉ. ऍंथनी फौची यांनी असेही म्हटले की, ते कोरोना विषाणूची ती लस वापरतील जी चाचणी दरम्यान कमीतकमी ७० ते ७५ टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध होईल. तज्ञांचे म्हणणे आहे की, एक प्रभावी लस दिल्यावर समाजातील ६० टक्के लोक इम्यून होतात, तर तेथे हर्ड इम्युनिटी निर्माण होईल. यामुळे व्हायरसची साखळी खंडित होईल आणि संसर्ग थांबेल.

एका वृत्तसंस्थेनुसार, मागच्या महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात असे दाखवले गेले होते की, लस स्वस्त आणि सहज उपलब्ध असतानाही अमेरिकेतील एक तृतीयांश लोक लस लावणार नाहीत. तसेच जेव्हा फौची यांना विचारले गेले की, लोकसंख्येच्या दोन-तृतियांश लोकांना ७० ते ७५ टक्के प्रभावी लस दिली गेली तर हर्ड इम्युनिटी प्राप्त होईल का? ते म्हणाले कि नाही, त्याची शक्यता कमी आहे.

फौची म्हणाले की, अमेरिकेतील काही लोकांमध्ये विज्ञानविरोधी, प्राधिकरणविरोधी, लसविरोधी वातावरण तयार होत आहे. ते म्हणाले की, लसविरोधी आंदोलन पाहता आम्हाला अद्याप बरेच काम करावे लागेल, जेणेकरुन लोकांना लसीबद्दलचे सत्य सांगता येईल. परंतु ते म्हणाले की हे सोपे होणार नाही.

अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍलर्जी अ‍ॅन्ड इन्फेक्टीव्ह डिसिजचे संचालक डॉ. अँथनी फौची म्हणाले- ‘गोवरच्या बाबतीत आम्हाला ९७ ते ९८ टक्के प्रभावी लस मिळाली होती. तसे झाल्यास खूप बरे होईल. पण आम्ही ते करू शकतो असे मला वाटत नाही. मी कोरोना लस ७० ते ७५ टक्के प्रभावी असल्यास वापरू इच्छितो.’