अमेरिका : बर्नी सैंडर्स यांनी राष्ट्रपती पदाची उमेदवारी घेतली मागे

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावा दरम्यान अमेरिकेतून एक मोठी बातमी समोर आली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने अमेरिकेचे प्रबळ अध्यक्षपदाचे उमेदवार बर्नी सँडर्स यांनी त्यांचे नाव मागे घेतले आहे. यामुळे आता निश्चित झाले आहे की, नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर आता डेमॉक्रॅटिक पक्षाचे जो बाइडेन हे शेवटचे उमेदवार असतील.

ट्रम्प यांनी उडविली खिल्ली,
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीह यावर प्रतिक्रिया व्यक्त केली असून त्याची तुलना हिलरी क्लिंटनच्या मोहिमेच्या समाप्तीशी केली. त्यांनी बर्नी सँडर्स समर्थकांना रिपब्लिकन पार्टीमध्ये येण्यास सांगितले आहे.

डेमोक्रॅटच्या उमेदवारीपेक्षा ट्रम्प यांची निवड अधिक फायदेशीर : चीन
अमेरिका सध्या कोरोना विषाणूचा जबरदस्त फटका बसत आहे. या संदर्भात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावरही दबाव आहे. त्याचबरोबर, एका अहवालात असेही म्हटले आहे की अमेरिकेमध्ये नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरही चीनची नजर असल्याचे तज्ञांचे मत आहे. डेमोक्रॅट उमेदवाराऐवजी ट्रम्प यांची पुन्हा निवड होणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते असा चीनचा विश्वास आहे. डेमोक्रॅट मानवाधिकार आणि व्यापाराच्या बाबतीत चीनवर दबाव आणण्याचा प्रयत्न करेल अशी भीती चीनला आहे. त्याचबरोबर ट्रम्प प्रशासनाच्या हिताचे आहे की, चीनकडून होत असलेल्या वैद्यकीय पुरवठा कोणत्याही करतास्तव खंडित होऊ नये, जेणेकरून अमेरिकेत संसर्ग झालेल्या लोकांच्या उपचारावर कोणतेही संकट उद्भवणार नाही.