पुस्तकाचा दावा : अमेरिकेनं बनवलं आतापर्यंतचं सर्वात घातक ‘हत्यार’, ट्रम्प यांना किमजोंग यांनी सांगितलं होतं ‘काका’ला कसं मारलं

वॉशिंग्टन : पोलीसनामा ऑनलाइन  –   कोरोना व्हायरस आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन आणि एका रहस्यमय अमेरिकन शस्त्राबाबत नवीन पुस्तक ’रेज’ मुळे प्रसिद्ध अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची वक्तव्य चर्चेत आली आहेत. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी आता दोन महिन्यांपेक्षा सुद्धा कमी वेळा बाकी असताना आलेले हे पुस्तक ट्रम्प यांच्यासाठी समस्या ठरू शकते. हे पुस्तक अमेरिकचे शोध पत्रकार बॉब वुडवर्ड यांनी लिहिले आहे. हे ट्रम्प यांच्या 18 मुलाखतींवर आधारित आहे आणि 15 सप्टेंबरपासून दुकानांमध्ये उपलब्ध होणार आहे. वुडवर्ड यांनी या पुस्तकाचे आणि मुलाखतींचा काही अंश मीडियासाठी जारी केला आहे.

किमबाबत काय आहे

पुस्तकानुसार, ट्रम्प यांनी वुडवर्ड यांना सांगितले होते की, ते जेव्हा पहिल्यांदा 2018 मध्ये सिंगापूरमध्ये किम जोंग उनला भेटले तेव्हा खुप प्रभावित झाले. ट्रम्प यांनी म्हटले – किमने मला सर्वकाही सांगितले. किमने हे सुद्धा सांगितले की, त्यांनी आपल्या काकाचा खून कशाप्रकारे केला. ट्रम्प यांनी लेखकाला म्हटले होते की, सीआयएला माहितच नाही की प्योंगयांगला कसे तोंड द्यायचे आहे. ट्रम्प यांनी उत्तर कोरियाबाबत म्हटले होते की, ते अणूशस्त्रांवर आपल्या घराप्रमाणे प्रेम करतात, आणि ते विकू शकत नाहीत.

कोरोनाच्या धोक्याला दिले नाही महत्व

ट्रम्प यांनी मान्य केले होते की, त्यांनी जीवघेण्या कोरोनाच्या धोक्याला सार्वजनिकदृष्ट्या यासाठी महत्व दिले नाही, कारण त्यांना लोकांमध्ये भिती निर्माण करायची नव्हती. ट्रम्प यांनी मार्चमध्ये वुडवर्ड यांना म्हटले होते, मी यास नेहमीच कमी महत्व देऊ इच्छित होतो. मी आताही यास महत्व देत नाही. लोकांमध्ये भय पसरू नये असे मला वाटते. ट्रम्प यांनी सात फेब्रुवारीला एका अन्य मुलाखतीत म्हटले होते, कोरोना व्हायरस खुप घातक फ्लू आहे आणि तो हवेतून सुद्धा पसरू शकतो.

अमेरिकेचे गोपनीय शस्त्र

2017 मध्ये अमेरिका आणि उत्तर कोरियामध्ये वाढत असलेल्या तणावाच्या दरम्यान ट्रम्प वुडवर्डना म्हणाले होते, मी एक अणू प्रणाली बनवली आहे, जी या देशात अगोदर कधीही नव्हती. आपल्याकडे एक अशी वस्तू आहे, जिच्याबाबत पुतिन (रशियन राष्ट्रपती) आणि जिनपिंग (चीनी राष्ट्रपती) यांनी पूर्वी कधी ऐकले सुद्धा नसेल.

अमेरिकेत वंशवाद

वुडवर्ड यांनी राष्ट्रपतींना विचारले होते की, एक श्वेतवर्णीय व्यक्ती म्हणून कृष्णवर्णीय अमेरिकन नागरिकांचा राग आणि वेदना चांगल्या प्रकारे समजून घेणे त्यांची जबाबदारी आहे का. ट्रम्प यांनी म्हटले – नाही, मला तसे वाटत नाही. अमेरिकेत वंशवाद आहे? यावर ट्रम्प यांनी म्हटले -होय, अमेरिकेत सुद्धा आहे आणि ती दुर्भाग्यपूर्ण आहे.

बिडेन यांचा हल्ला

ट्रम्प यांचे डेमोक्रेट विरोधक जो बिडेन यांनी कोरोना बाबत राष्ट्रध्यांनी व्यक्त केलेल्या मतावर म्हटले की, हा अमेरिकन लोकांसोबत विश्वासघात आहे. राष्ट्राध्यक्ष जाणीवपूर्वक खोटं बोलत होते, उलट त्यांनी आपल्या कर्तव्याचे पालन करायला पाहिजे होते. सभागृहाच्या स्पीकर नँसी पेलोसी यांनी म्हटले की, ट्रम्प यांची वक्तव्ये त्यांची कमजोरी दर्शवतात.